King Cobra Shocking Video : सापाचे नाव ऐकले तरी भल्याभल्यांना घाम फुटतो. त्याचा जवळ जाणं तर दूर तो दिसला तरी लोक पळू लागतात. कारण हा सरपटणारा विषारी प्राणी कुठे जाऊ शकतो आणि कोणालाही दंश करत क्षणात ठार करु शकतो. त्यामुळे हा प्राणी मनुष्यासाठी अत्यंत धोकादायक मानला जातो. सापाच्या अशा काही प्रजाती आहे ज्या अतिशय विषारी मानल्या जातात. याच विषारी प्रजातींपैकी एक म्हणजे किंग कोब्रा. काही सर्पप्रेमी जीव धोक्यात घालून विषारी किंग कोब्रा सापाशी खेळताना दिसतात. पण असे करणे अनेकदा त्यांच्या जीवावर बेतते. सध्या सोशल मीडियावर एका महाकाय किंग कोब्राचा असाच व्हिडीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुमच्या काळजात धडकी भरल्याशिवाय राहणार नाही.

व्हिडीओ पाहून युजर्स शॉक

तुम्ही सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना पाहिले असतील ज्यात काही लोक सापाबरोबर खेळताना दिसतात. कधी मानेवर कधी डोक्यावर ठेवून तर कधी सापाला अगदी तोंडाजवळ घेऊन जात जीवघेणे प्रकार करतात. अशाचप्रकारे एक तरुण भल्यामोठ्या किंग कोब्रा सापाला हाताने पकडून काहीतरी माहिती सांगत होता. यानंतर त्याने सापाला अगदी आपल्या तोंडासमोर पकडले आणि त्याची किस घेतली. याचवेळी किंग कोब्रा सापाने तरुणाच्या कपाळावर दंश केला.

व्हिडीओ तुम्ही पाहू शकता की, एक तरुण हातात विषारी कोब्रा साप धरून तो कॅमेरासमोर बोलत आहे, बोलत असताना तो तरुण अचानक कोब्रा सापाची किस घेऊ लागतो. यावेळी किंग कोब्रा रागवतो आणि प्रत्युत्तरात तो तरुणावर हल्ला करतो, कोब्रा तरुणाच्या कपाळावर दंश करतो. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये माहिती देण्यात आली आहे की, हा व्हिडिओ उझबेकिस्तानचा आहे आणि ज्या तरुणाच्या कपाळावर सापाने दंश केला तो तरुण आता पूर्णपणे सुरक्षित आहे.

पुणे पोलीस आहात कुठे? भररस्त्यात जोडप्याने अक्षरश: मर्यादा ओलांडली? VIDEO पाहून संतापले लोक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा धोकादायक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर @doktorkobra_official नावाच्या अकाऊंटद्वारे शेअर करण्यात आला आहे , जो आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे आणि हजारो लोकांनी लाइक केला आहे. तर अनेकांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने लिहिले की, और भावा, मज्जा आली का? दुसऱ्याने लिहिलेय की, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारणे यालाच म्हणतात. तिसऱ्याने लिहिलेय की, भाऊ, तो कालिदासजींचा शिष्य आहे असे वाटते