Injured King Cobra Video : सध्या पावसाळा असल्याने सापांच्या बिळात पाणी साठते. त्यामुळे साप बाहेर पडून लोकवस्तीत येतात. यावेळी ते जागा मिळेल तिथे घर करून राहतात. त्यात काही दुर्मीळ साप तर काही विषारी साप पाहायला मिळतात. मात्र, लोक भीतीपोटी सापांना मारतात, त्यांना गंभीररीत्या जखमी करतात. सध्या अशाच एका गंभीर जखमी झालेल्या नागाचा व्हि़डीओ व्हायरल होतोय. जो पाहून तुमच्याही अंगावर काटा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण- त्या नागाच्या फण्याजवळ इतकी खोलवर जखम झाली आहे की, ती पाहूनच खूप भीती वाटतेय. पण इतका जखमी होऊनही तो नाग फणा काढून डौलात उभा आहे. त्यामुळे अनेकांनी देवाच्या कृपेमुळेच हा नाग वाचला, असे म्हटले आहे.

नागाची अवस्था पाहून असे वाटतेय की, माणसाने किंवा कोणत्या तरी प्राण्याने त्याच्या फण्याजवळ गंभीररीत्या हल्ला केला आहे. कारण- त्या नागाच्या फण्याजवळील अर्ध्या भागावर खोल जखम झालीय. ही जखम इतकी भीषण आहे की, त्यातून सापाच्या फण्याजवळील मांसही दिसतंय. ही जखम बरी व्हावी म्हणून कोणीतरी त्यावर मलमपट्टी केलीआहे. इतकी जखम असतानाही तो वाचला म्हणजे ही देवाचीच कृपा आहे, असे काही जण म्हणत आहेत.

व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, हा मानवी वस्तीचा भाग आहे, जिथे काही लोकांमध्ये गंभीर जखमी नाग फणा काढून डौलात उभा आहे, त्याच्या फण्याजवळ इतकी मोठी जखम झालीय की आतील पूर्ण मांस दिसतयं, ज्यावर कोणीतरी हळद लावली आहे. पण तो नाग इतका जखमी होऊनही अगदी ऐटीत फणा काढून उभा आहे. अनेक लोक यावेळी त्याचा व्हिडीओ बनवताना दिसतायत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

sarpmitra_prakashtule_official नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून नागाचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. ज्यावर लोक वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिलेय की, देव तारी त्याला कोण मारी, दुसऱ्याने लिहिलेय की, एवढा फणा तुटला आहे तरी कसा थाटात फणा पसरवून उभा आहे.