King Cobra Funny Video : सापाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. त्यात किंग कोब्रा ही सापाची प्रजाती सर्वांत घातक मानली जाते. अशा परिस्थितीत जर चुकून या सापाचा दंश झाला, तर माणसाचा उपचाराविना काही मिनिटांत मृत्यू होऊ शकतो. तसेच हा साप केवळ विषारीच नाही, तर आक्रमकदेखील आहे. त्यामुळे गरज पडल्यास तो स्वतःच्या साथीदारांशीही लढताना दिसतो. त्यामुळे कितीही अनुभवी सर्पमित्र असू दे; तोही किंग कोब्राला अतिशय सावधपणे हाताळतो. केवळ माणूसच नाही, तर प्राणीदेखील या सापापासून दूर पळतात. दरम्यान, सोशल मीडियावरही या खतरनाक सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात आता एका सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरचा किंग कोब्राबरोबर चक्क मजा-मस्ती करतानाचा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात त्याने किंग कोब्राचा लूक असा काही चेंज केलाय की, ते पाहून अनेकांना प्रश्न पडला आहे की, नक्की हा किंग कोब्रा आहे की कुकल बाळ.

व्हिडीओमध्ये त्या इन्फ्लुएन्सरने किंग कोब्राला चक्क लोकरीच्या धाग्यापासून विणलेली टोपी घातली आहे. ज्यामुळे तो किंग कोब्रा आहे की कुकुल बाळ, असा प्रश्न पडतो. कारण- कुकुल्या बाळाला अशा प्रकारे हाताने विणलेली लोकरीची टोपी घातली जाते. पण, सापाला अशा प्रकारे घातलेली टोपी पाहून अनेक जण चकित झालेत आणि अनेकांना हसू आवरणे अवघड झाले आहे.

इन्फ्लुएन्सरने चक्क किंग कोब्राला घातली टोपी

इंडोनेशियन इन्फ्लुएन्सर सहबत आलम (@sahabatalamreal)ने इन्स्टाग्रामवर टोपी घातलेल्या सापाबरोबरचे दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये तो आरामात टोपी घातलेल्या किंग कोब्राच्या बाजूला बसून चहा पितोय. याच वेळी तो सापाच्या टोपीला स्पर्श करीत त्याला डिवचण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे साप चिडतो आणि दंश करण्यासाठी त्याच्या दिशेने उडी मारतो. हे पाहून तो तरुण हसतो आणि वारंवार सापाला त्रास देत राहतो. तर, दुसऱ्या व्हिडीओमध्ये तो सापाला एका टेबलावर ठेवतो आणि त्याच्या अगदी बाजूला ठेवलेल्या ग्लासामध्ये पाणी भरत असतो. हे पाहून साप आपला फणा मागे फिरवतो आणि थेट टेबलावरून खाली कोसळतो. त्यानंतर तरुण सापाबरोबर अगदी मित्र असल्याप्रमाणे मजा-मस्ती करताना दिसतोय.

किंग कोब्राचा हा गोंडस लूक तुम्हाला कसा वाटला?

दरम्यान, किंग कोब्राचा हा गोंडस लूक अनेकांना पाहून हसू येतंय. दरम्यान, अनेक जण व्हिडीओच्या कमेंट्स सेक्शनमध्ये सापाच्या या नव्या लूकविषयी भन्नाट कमेंट्स करीत आहेत. बरेच लोक म्हणतायत की, हे एक मजेदार काम आहे. तर काहींनी म्हटले की, किंग कोब्राबरोबर अशी मस्ती करू नका, जी तुमच्यासाठी जीवघेणी ठरू शकते. तर, काहींनी अशा प्रकारे किंग कोब्राबरोबर खेळणं तुमच्या जीवावर बेतू शकते, असे म्हटलेय.

View this post on Instagram

A post shared by SAHABAT ALAM (@sahabatalamreal)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“किंग कोब्रा आहे की क्वीन कोब्रा”, युजरची मजेशीर कमेंट

तर शेवटी एकाने मिश्कीलपणे कमेंट करीत म्हटले की, नक्की हा किंग कोब्रा आहे की क्वीन कोब्रा. किंग कोब्राचा अभिमान कमी केला जात आहे. तो कदाचित मी किती गोंडस दिसते याचाही विचार करीत असेल.