Funny video: तुम्ही आतापर्यंत भांडणाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले पाहिले असतील. नुकताच एक असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे; जो पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. त्याशिवाय स्त्रिया कुठे आणि कशावरून भांडतील हे सांगता येत नाही, असंही नेटकरी म्हणत आहेत. त्याचं कारण म्हणजे कोल्हापुरात सध्या पैठणी जिंकण्यासाठी दोन वहिनी एकमेकींना भिडलेल्या दिसत आहेत. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन महिला एकमेकींशी भांडताना दिसत आहेत. खरं तर महिलांमध्ये साड्यांची खूप क्रेझ असते. त्यांना सतत नवीन साड्या खरदी करण्याची आवड असते.

साडी म्हणजे तमाम महिलावर्गाचा वीकपॉईन्ट. साडी खरेदीच काय, पण त्याच्या विंडो शॉपिंगमध्येही महिलांचा तासतासभर वेळ जातो. आवडीचा रंग, डिझाईन आणि त्यावर मॅचिंग अॅक्सेसरिज मिळाल्या की कळी खुललीच म्हणून समजा. मात्र, याच साडीसाठी स्पर्धा लागली, तर ती जिंकण्यासाठी महिला काय करतील याचा नेम नाही. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. सध्या नवरात्र सुरू आहे, अन् नवरात्र म्हटलं तर गरबा आलाच. पण गरब्यासोबतच अनेक ठिकाणी महिलांसाठी खास मजेशीर कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांमध्ये डान्स, गायन, संगीत खुर्ची, लंगडी असे काही मजेशीर खेळ खेळले जातात. आणि अर्थातच विजेत्यांना आकर्षक बक्षिसं मिळतात. पण ही बक्षिसं जिंकण्यासाठी काीह महिला अक्षरश: जीव तोडून खेळतात. अशाच काही महिलांचा एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरून हसाल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, कोल्हापुरातील मंगळवार पेठेत हा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. यावेळी दोन्ही वहिनी एकमेकींना हरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. पैठणीच्या या खेळात दोघींच्या हातात एक-एक फुगा दिला आहे. जिचा फुगा शेवटपर्यंत न फुटता राहणार, तिला पैठणी मिळणार, असा हा खेळ आहे. त्यामुळे दोघीही एकमेकींना हरविण्याचा प्रयत्न करतात. आपला फुगा वाचविण्यासाठी आणि समोरच्या महिलेचा फुगा फोडण्यासाठी दोघींमध्ये चांगलीच कुस्त्ती रंगते. यावेळी साडीचा विषय आहे म्हटल्यावर दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या आहेत.  शेवटी दोघीही खाली पडतात,  त्या एवढ्यावरच थांबत नाहीत, तर पुन्हा खेळू लागतात.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: “उधारी एक जादू…” उधारी बंद ठेवण्यासाठी दुकान मालकानं सांगितलं भन्नाट कारण; पुणेरी पाटी पाहून पोट धरुन हसाल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@b_vishal_78 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “शेवटी कोल्हापूर आहे भावा” तर आणखी एकानं म्हंटलंय, “कुणीच कुणाला ऐकत नाहीये”