भारतात प्रत्येक नात्याला मानाने वागवणे जाते जेणेकरून नातं आणखी दृढ होईल. पण सर्व नात्यांमध्ये जर कोणाचे खूप लाड केले जात असतील तर तो असतो जावई. लग्नाआधी आणि लग्नानंतर जावयाचे भरभरून लाड केले जातात. कारण लेकीला सासरी सांभाळून घेणारा जावयाचे सासू सासऱ्यांच्या मनात खास स्थान असते. जावई घरी आला तर त्याल्या कुठे ठेवू आणि कुठे नको असे सर्वजण वागत असतात. जावई घरी येणार असेल तर सर्व पदार्थ त्याच्या आवडीचे बनवले जातात. सणासुदीला त्याला नवीन कपडे खरेदी केले जातात. पण सोशल मीडियावर एका असा जावयाची चर्चा आहे जो सासू सासऱ्यांसाठी खास चहा बनवतो आहे. विशेष म्हणजे हा जावई परदेशी आहे.

इंस्टाग्रामवर Puccino आणि jaehyeon_0610 नावाच्या अकाउंटवर हा व्हिडी पोस्ट केला आहे. व्हिडीओमध्ये एक कोरियन तरुणाने चक्क त्याच्या भावी सासू-सासऱ्यांसाठी गरमा गरम मसाला चहा बनवला आहे. होय तुम्हाला विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. व्हिडीओमध्ये दिसते की कोरियन तरुण सासूबरोबर किचनमध्ये चहा बनवतो आहे. सासूने सांगितलेल्या सुचनांचे पालन करू तो भारतीय पद्धतीने बनवला जाणारा दुधाचा चहा तयार करतो आहे. चहा बनवतो तो काय करतो आहे देखील त्याच्या दर्शकाना इंग्रजीमध्ये सांगत आहे. एवढचं नाही तर तो गोंडस मराठी आणि हिंदी भाषेतही बोलत आहे. त्यानंतर गरमा गरम चहा तो सासू सासऱ्यांना देतो. पहिला घोट पिताच सासू-सासरे खुश होतात. सासू जावयाचे कौतूक करताना म्हणते, “एकदम छान! अगदी मी बनवते तसाच झालायं” हा व्हिडीओ पाहून कोणत्याही सासू-सासऱ्यांना वाटेल की असा जावई पाहिजे.

हेही वाचा – कचऱ्याच्या ढिगाऱ्यात सोडलेल्या मांजरीच्या पिल्लांची महिलेने केली सुटका, हृदयद्रावक Video Viral

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – जंगलात ठेवला होता आरसा; स्वतःला पाहून बिबट्याने जे केले ते पाहून तुम्हीही जोरजोरात हसायला लागाल!

व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला आहे. व्हिडीओवर एकाने कमेंट करताना लिहिले की, “त्याने दोन्ही हातात चहा घेतला…हे पाहून एखादी मुलगी सासऱ्यांसमोर चहा घेऊन जात असल्यासारखे वाटले.” दुसऱ्याने लिहिले,”मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर भारत सरकार त्याचा व्हिसा कधीच नाकारणार नाही” तिसऱ्याने म्हटले, “त्याचं मराठी किती छान आहे.” चौथा म्हणाला, “तुम्ही त्याला अर्धे मराठी आणि अर्धे हिंदी कसे शिकवले ते आवडले त्यामुळे ते मराठी, हिंदी आणि इंग्रजीचे मिश्रण बाहेर येते.” पाचवा म्हणाले,” थांबा मला आत्ताच कळलं की माझी आवडती व्यक्ती मराठी आहे!? मला तुमचे व्हिडिओ आणि मराठी तर टॉप क्लास आहे ताई, मला ते आवडतात.” आणखी एकाने लिहिले, तुझे पालक खूप भाग्यवान आहेत त्यांना असा जावई मिळाला.