lalbaug cha raja 2025 Crowd: मुंबईच्या गणेशोत्सवाची पुन्हा एकदा जगभरात चर्चा होत आहे. गणेशोत्सवाचा धूमधडाका सुरू होताच, राज्यभरातील गणेशभक्त लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी सर्वात जास्त उत्सुक असतात. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी लांब रांगेत उभे राहतात. या गणेशोत्सवातील एक प्रमुख आकर्षण म्हणजे ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळ.. लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाच्या दरबारात दररोज भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. दोन दिवसांपूर्वी लालबागच्या राजा गणपतीच्या दरबारात भाविक आणि मंडळाच्या स्वयंसेवकांमध्ये शाब्दिक खडाजंगी झाली होती. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जगभरातून लोक येत असतात. या ठिकाणी दररोज भाविकांच्या गर्दीत वाढ होत आहे. अशातच आता एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये भाविकांच्या संयमाचा अंत झाला आणि प्रचंड संख्य़ेनं भाविक गेट तोडून आतमध्ये घुसले.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, लालबागच्या राजाचं मुख्य प्रवेश द्वारासमोर कुणी आत येऊ म्हणून पोलिसांनी गेटसारखे पिवळ्या रंगाचे बॅरिगेट्स लावले आहेत. यावेळी आतमध्ये येण्यासाठी भाविकांनी गर्दी केली,मात्र पोलीस आणि कार्यकर्ते रांगेतून येण्यासाठी सांगत होते. लालबागच्या राजाचं दर्शनासाठी वेगवेगळ्या ठिकाणाहून बऱ्याच रांगा आहेत आणि त्यातही दर्शनाला लागणारे तासंतास त्यामुळे भाविक वैतागले होते. अशातच मोठ्या संख्येनं भाविक आले अन् थेट बॅरिगेट्स तोडून आतमध्ये शिरले. भाविकांची संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात होती की पोलिसांनाही हा लोंढा सांभाळता आला नाही. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे दर्शनासाठी करण्यात आलेली भाविकांची रांग तुटली. यामुळे धक्काबुक्कीचे प्रसंग घडले. यावेळी स्वयंसेवक आणि भाविकांमध्ये शाब्दिक खडाजंगीही झाली.
गर्दी वाढल्याने मंडळ कार्यकर्त्याचा मुजोरपणाही अधिक वाढलाय. भाविकांना धक्काबुक्की असे प्रकार अजूनही सुरू आहेत. तर दुसरीकजे ज्यात व्हीआयपींना निवांत दर्शन घेऊ दिलं होतं. त्याचवेळी सर्वसामान्यांना मात्र अक्षरशः ढकललं जात असल्याचं आपण बघितलं होतं. अजूनही तीच परिस्थिती दिसून येत आहे.नवसाला पावणारा गणपती अशी मुंबईतील लालबागचा राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागचा राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात.
पाहा व्हिडीओ
लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागचा राजाला पाहायला भाविकांची प्रचंड गर्दी आहे. मुख दर्शनाची रांग असो किंवा चरण स्पर्श, भाविक तासनतास रांगेत उभे आहेत. यावेळी लालबागचा राजाच्या दर्शनाला आलेल्या भाविकांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याचाच भयानक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.