Lalbaug crowd video: आज गणेशचतुर्थी घरोघरी बाप्पाच्या बाप्पांचं आगमन झालं आहे. आजपासून पुढील दहा दिवस गणेशोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. गणेशोत्सव महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. श्री गणेशाला बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याची देवता मानले जाते. महाराष्ट्र, गुजरात, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक अशा अनेक राज्यांमध्ये हा सण मोठ्या थाटामाटात आणि उत्साहाने साजरा केला जातो.मुंबईमधील गणेशोत्सवाची जगभरामध्ये दरवर्षी चर्चा होते. गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना राज्यभरातील गणेशभक्तांची सर्वाधिक उत्सुकता लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी असते. दरवर्षी लाखो भक्त येथे लांबच लांब रांगा लावून दर्शन घेतात. या गणेशोत्सवातील मुख्य आकर्षणांपैकी एक म्हणजे ‘लालबागचा राजा’ गणेशोत्सव मंडळ! यंदाच्या वर्षी या ठिकाणी आकर्षक सजावट करण्यात आली असून ‘लालबागचा राजा’चं दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी भक्तांनी प्रचंड गर्दी केली आहे.

नवसाला पावणारा गणपती, अशी मुंबईतील लालबागच्या राजाची ओळख आहे. त्यामुळेच मुंबई आणि मुंबईबाहेरूनदेखील लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी लोक येत असतात. राजाच्या दर्शनासाठी दर वर्षी लाखो लोक रांगा लावतात. लालबागचा राजा हा शहरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू आहे. यंदाही लालबागच्या राजाला पाहायला भाविक गर्दी करीत आहेत. दरम्यान, लालबागच्या राजाच्या दरबारातील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, त्यामध्ये भक्तांची प्रचंड गर्दी दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही लालबागच्या राजाला जाण्याआधी नक्की विचार कराल.

मुंबईतील लालबाग हा भाग गणेशभक्तांसाठी पंढरी मानला जातो.दरवर्षी लालबागच्या दर्शनासाठी लाखोंनी भाविक येतात, दोन-दोन दिवस रांगेत उभे राहतात. अशातच गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील लालबागचा राजा येथे प्रचंड गर्दीची परिस्थिती दिसून आली. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठा जमाव जमला होता. रस्त्यावर पहाटेपासूनच लांबच लांब रांगा याठिकाणी लागलेल्या दिसत आहेत. तुम्हीही मुंबईतील प्रसिद्ध अशा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी जात असाल, तर आधी हा व्हिडीओ नक्की बघा.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ meramumbai24 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.