Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. रविवारी सकाळी कोस्टल रोडवर एका लॅम्बोर्गिनी कारचा भीषण अपघात झाला. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही अति वेगात गाडी चालवताना शंभरवेळा विचार कराल.
‘अतिघाई संकटात नेई’, असे म्हणतात. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून आला आहे. काही वेळा लोक घाई-गडबडीत अशा चुका करतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतातात. मात्र, समोर आलेल्या अपघातात या कारचालकाचा अतिशहाणपणा त्याच्या अंगलट आल्याचे दिसत आहे.
कोस्टल रोडवर या कारचालकाचा कारवरील ताबा सुटला आणि ती दुभाजकावर आदळली. सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. या सुपरकारचा चालक एक ५२ वर्षीय व्यक्ती असल्याची माहिती समोर आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त लॅम्बोर्गिनी कार आशित शाह नावाची व्यक्ती चालवत होती. ही व्यक्ती दक्षिण मुंबईकडे जात असताना अपघात झाला. कोस्टल रोडवरील खांब क्रमांक ५३ जवळ कारवरील नियंत्रण सुटले आणि ती दुभाजकावर आदळली. सुदैवाने चालक शाह यांना मोठी दुखापत झाली नाही. या अपघाताची नोंद वरळी पोलिस ठाण्यात करण्यात आली.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात, ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @richapintoi नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.