Shocking video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाच धस्स होईल.

भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात. या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घाटात अनेक वाहने ट्राफिक जाममध्ये उभी होती आणि अचानक एक भयानक भूस्खलन होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या शुक्रवारी पश्चिम कोलंबियामध्ये भूस्खलन झाले, ज्यामध्ये १८ लोकांचा मृत्यू झाला, तर अनकजण जखमी झाले. मात्र, हा व्हिडीओ त्याच घटनेचा आहे की नाही, याची पुष्टी अद्याप झालेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोलंबियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या भागात मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे बचाव कार्यातही अडचणी येत आहेत. मात्र, दरड कोसळण्याचे कारण काय, हे त्यांनी सांगितले नाही. कोलंबियाच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम व्यवस्थापन युनिटने सांगितले की, क्विबो आणि मेडेलिन शहरांना जोडणाऱ्या डोंगराळ भागात भूस्खलन झाले. तसेच त्यांनी सांगितले की, या भीषण भूस्खलनामुळे संपूर्ण महामार्ग ठप्प झाला आहे, त्यामुळे लोकांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> बापरे! पालकांच्या मस्तीत ते बाळ उकळत्या तेलात पडलं असतं; हा VIDEO पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ एक्सवर @gunsnrosesgirl3 या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला हजारोंमध्ये लाइक शेअर केले जात आहे.