Shocking video: माणूस हा निसर्गावर मात केल्याच्या कितीही बाता मारत असला तरीही निसर्गापुढे तो तोकडाच आहे. निसर्गाने व्यापलेले विश्‍व आणि त्यात मानवाचे स्थान यांचा विचार केला तर असे लक्षात येते की, निसर्गापेक्षा माणूस लहानच आहे. कदाचित त्याला काही प्रमाणात गर्व होत असला तरीही कधी तरी त्या गर्वाचे घर खाली होते. निसर्गाचा जबरदस्त फटका बसतो. तो निसर्गाच्या हातातले बाहुले असल्याचे प्रत्यंतर येते. एकदा निसर्ग कोपला की, त्याच्या पुढे मानवाचे काही चालत नाही. आपण अशा निसर्गाच्या अवकृपेच्या बातम्या नेहमीच वाचत असतो. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. घाटामध्ये अचानक झालेल्या भूस्खलनामुळे मोठी हानी झालीय. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाच धस्स होईल. या व्हिडीओतून वेळेची किंमत न करणाऱ्यांना किंवा सर्वांनाच एका सेंकदाचीही काय किंमत असते हे कळेल.

‘दर पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडतात. त्यानंतर काही दिवस उपाययोजना केल्या जातात. त्यानंतर परिस्थिती ‘जैसे थे’ राहते. दर वर्षीच्या पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते. डोंगराळ भागात दरड कोसळण्याचे प्रकार पावसाळ्यात सर्रासपणे अनुभवायला मिळतात.

If You Dont Believe In Luck And Karma Then Just Watch This Video how man skip death
नशीब आणि कर्मावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; अवघ्या ३ सेंकदात तरुणासोबत नेमकं काय घडलं?
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Eagle carrying an entire adult deer
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?
Man Dies Due To Electric Shock While Washing Clothes In Washing Machine video
VIDEO: घरात वॉशिंग मशीनचा वापर करत असाल तर सावधान! कपडे धुताना व्यक्तीचा ३ सेंकदात अंत, नेमकं काय घडलं?
Video of a snake crawling on the hair of a sleeping woman went viral
झोपलेली असताना महिलेच्या केसात अडकला साप; थोडीशी हालचाल अन् खेळ खल्लास; थरारक VIDEO व्हायरल
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…

एका सेंकदाची किंमत या ड्रायव्हरला विचारा

भूकंप, त्सुनामी, भूस्खलन यासारख्या नैसर्गिक घटना अचानक घडतात. या नैसर्गिक घटनांमुळे किती लोकांना जीव गमवावा लागतो हे तुम्ही पाहिलेच असेल. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घाटात अनेक वाहने ये-जा करत आहेत. यावेळी अचानक एक भयानक भूस्खलन होते आणि यामध्ये एक कार सुखरुप पुढे येते तर एका जीपवर मोठा दगड कोसळतो फक्त एका सेंकदाच्या फरकानं ही दुर्घटना घडली आहे. सुदैवानं यामध्ये जीप ड्रायव्हर थोडक्यात बचावला असून फक्त जीपचे नुकसान झाले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामधून एका सेंकदाचंही किती महत्त्व आहे हे कळून येत आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> रीलच्या नादात मृत्यूच्या दारात गेला; हत्तीनं चिरडलं अन् १५ सेकंदात झालेल्या वेदनादायक मृत्यूचा VIDEO व्हायरल

घटनेनंतर घाटात वाहतूक कोंडी झाली होती. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने वाहन बाजूला केली. त्यानंतर वाहतूक पूर्वपदावर आली. यापूर्वी या घाटात अशा प्रकारचे अपघात झाले आहे. त्यामुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या व्हिडीओवर अनेकजण संताप व्यक्त करत प्रतिक्रिया देत आहेत.