Gunaratna Sadavarte Dance Video: मुंबई उच्च न्यायालयातील वकील गुणरत्न सदावर्ते हे नाव गेल्या काही वर्षांत वाद, चर्चा आणि विधानांमुळे सतत प्रकाशझोतात राहिलं आहे. कधी राजकारण्यांवर थेट टीका, तर कधी सामाजिक विषयांवर ठाम भूमिका घेऊन ते नेहमी चर्चेत राहतात. पण, यावेळी मात्र त्यांच्या एका हटके शैलीमुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधलं गेलं आहे.
गंभीर मुद्द्यांवर नेहमीच कोर्टात आपली धारदार भूमिका मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते…, पण यावेळी ते एका वेगळ्याच अंदाजात दिसले. मंचावर वाजतं गाणं ‘मैं हूँ डॉन’ आणि सभागृहात जमलेले लोक थक्क होऊन पाहात राहिले. कोर्टातील रागीट वकील अचानक रंगमंचावर ठुमका लगावताना दिसले, तर लोकांच्या टाळ्या आणि शिट्यांनी संपूर्ण हॉल दणाणून गेला. शेवटी हा अनोखा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकरी आश्चर्याने विचारू लागले, “हे खरोखरच तेच सदावर्ते आहेत का?
सध्या सोशल मीडियावर त्यांचा एक भन्नाट व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. पार्श्वभूमीवर गाणं वाजतं, “मैं हूँ डॉन…” आणि सदावर्ते यांचा उत्साहात दिसलेला डान्स. एका कार्यक्रमात मुलगी झेन हिच्या यशाचा आनंद साजरा करताना त्यांनी हा अनोखा ठुमका लावला. कोर्टात गंभीर मुद्द्यावर लढणारे सदावर्ते असे रंगीबेरंगी मूडमध्ये पाहून लोक अक्षरशः थक्क झाले.
कार्यक्रमाच्या वेळी हॉलमध्ये जमलेल्या लोकांनी टाळ्या आणि शिट्यांचा जोरदार गजर केला. उत्साहाच्या भरात सदावर्तेंनी केलेले भन्नाट स्टेप्स पाहून कुटुंबीय आणि उपस्थित लोक अवाक झाले. काही क्षणांसाठी तर जणू संपूर्ण हॉल फक्त त्यांच्या तालावर थिरकू लागला होता. हा अविस्मरणीय व्हिडीओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हा डान्स व्हिडीओ @shreshthamaha या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, नेटकरी सतत “वाह वकील साहेब, कोर्टाबाहेरही भारीच धमाल करता”, “गंभीर चेहऱ्याच्या मागे असं मजेशीर व्यक्तिमत्त्व आहे हे माहीतच नव्हतं”, अशा प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी तर सदावर्तेंना “डान्सिंग डॉन” ही उपाधी दिली आहे.
यामागचं खऱ्या आनंदाचं कारण म्हणजे त्यांची मुलगी झेन. लंडनमधील ईस्ट लंडन युनिव्हर्सिटीमध्ये झेन हिने वकिलीच्या शिक्षणासाठी प्रवेश घेतला आहे. एलएलबी ऑनर्सनंतर ती बॅरिस्टर होण्यासाठी तयारी करणार आहे. विशेष म्हणजे हा प्रवेश तिनं गुणवत्तेच्या जोरावर मिळवला आहे. परदेशी विद्यापीठात प्रवेश घेऊन ती परत भारतात येईल आणि गरजूंसाठी वकिली करेल, अशी माहिती स्वतः सदावर्ते यांनी दिली.
मुलीच्या या यशाचा आनंद व्यक्त करण्यासाठी सदावर्तेंनी कोर्टातील गंभीर प्रतिमेला थोडा विराम दिला आणि रंगमंचावर दिलेले ठुमके आता सर्वांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. थोडक्यात, “वकील साहेब कोर्टात जितके तडाखेबंद, तितकेच रंगमंचावरही ‘डॉन’ ठरले!”