Leopard Hunting Crocodile Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात. तर काही व्हिडीओ असे असतात की, ज्यांना पाहिल्यानंतर अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही. आता नुकतच सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ व्हायरल होत आहे. एक खुंखार बिबट्या पाण्यात राहून मगरीची कशाप्रकारे शिकार करतो, हे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की बिबट्याने मगरीची शिकार करण्यासाठी कशापद्धतीने सापळा रचला होता.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, बिबट्या शांतपणे पाण्यात लपलेला असतो. मगरीची शिकार करण्यासाठी बिबट्या चपळाईने नजर फिरवत असतो. मगर पाण्यात दिसताच बिबट्या क्षणाचाही विलंब न लावता मगरीला जखडून टाकतो. बिबट्या भल्या मोठ्या मगरीचा शिकार केल्यानंतर तिला पाण्याच्या बाहेरू घेऊन जात असल्याचं या व्हिडीओत पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे.

नक्की वाचा – Viral Video: मेट्रोमध्ये हेअर स्ट्रेटनर घेऊन आली आणि… व्हिडीओ पाहून थक्क व्हाल

इथे पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

@figensport नावाच्या ट्वीटर युजरने हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केला आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओला १ लाख ८४ हजारांहून अधिक व्यूज मिळाले आहेत. तसंच या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, हा तर खतरनाक शिकारी आहे. तसंच या व्हिडीओला दुसऱ्या एका युजरने प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, खूपच सुंदर व्हिडीओ. बिबट्याच्या शिकारीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. पण हा व्हिडीओ इतर व्हिडीओंपेक्षा अधिक भयानक असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.