Leopard Hunting Video: जंगलात सर्वांत क्रूर आणि धडकी भरवणाऱ्या शिकाऱ्यांची यादी काढली, तर ‘बिग कॅट्स’– म्हणजेच सिंह, वाघ, बिबट्या हे प्राणी अग्रस्थानी येतात. पण, या सगळ्यांमध्ये जर कोणी अत्यंत थंडपणे, क्षणात आणि निर्दयपणे शिकार करतो, तर तो म्हणजे बिबट्या (Leopard). तो भेदक नजर आणि चपळाई यांच्या जोरावर इतक्या शिताफीनं शिकार करतो की, समोरच्याला पळायचा अवकाशही मिळत नाही. असाच एक धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये बिबट्याने जणू काही ‘उड्डाण’ करीत एका हरणाची शिकार केली आहे.

जंगलात कधी काय घडेल याचा काही नेम नसतो… येथे एक क्षण शांततेचा, तर दुसऱ्याच क्षणी जीवघेणा संघर्ष! या अरण्यविश्वाचा एक निश्चित नियम आहे, येथे जो क्षण साधतो, तोच जगतो… आणि चुकणाऱ्याला क्षमा नाही. अशीच एक थरारक घटना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बिबट्याचा एक असा व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात त्यानं अक्षरशः उड्डाण करून एका ‘त्या’ निष्पाप जीवावर हल्ला केला आणि क्षणार्धात त्याचा जीव घेतला. हे दृश्य इतकं चित्तथरारक आहे की, काही क्षणांसाठी वाटतं, आपण एखाद्या अॅक्शन सिनेमाचा सीन पाहतोय की काय?

बिबट्याच्या त्या एकाच उडीने इंटरनेटवर खळबळ माजवली आहे. ज्यांनी व्हिडीओ पाहिला, ते अजूनही थराराक दृश्यात बुडून गेलेत. व्हिडीओमध्ये दिसतं की हरणांचा एक मोठा कळप शांततेनं गवत चरत असतो. त्याच वेळी त्यांना काहीतरी चुकीचं जाणवतं, कोणीतरी शिकारासाठी दबा धरून बसलं आहे. काही क्षणांत त्यांना बिबट्याची चाहूल लागते आणि पूर्ण कळप वेगानं पळायला सुरुवात करतो. काही हरणं इतक्या जोरात उड्या मारत पळतात की, त्यांना पाहून वाटतं, जणू ती उडतायत. पण या गोंधळात बिबट्याची चपळाई त्यावर वर्चस्व मिळवते. तो एकाच उडीने हवेत झेप घेतो आणि थेट एका हरणावर झडप घालतो. क्षणात त्या बिचाऱ्या हरणावर मृत्यूचा घाला पडतो.

बिबट्याची निर्दयी शिकार पाहून नेटकरी थक्क

ही क्लिप Instagram वर ‘natureismetal’ नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे आणि हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी लिहिलंय, “हे खरंच बिबट्याचं शिकारीसाठी उडणं पाहिलं!”, तर काहींनी म्हटलं, “या व्हिडीओमुळे समजलं की, जंगलात खरं राजकारण चालतं”. एकानं तर लिहिलं, “यालाच म्हणतात क्रूर शिकारी!”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

येथे पाहा व्हिडीओ


ही घटना पुन्हा एकदा सिद्ध करते की, जंगलातलं जग काहीही असू शकतं – इथे क्षणांत सर्व बदलतं, आणि जो वेळ साधतो, तोच जगतो! बिबट्याच्या या एकाच उडीनं सोशल मीडियावरही उड्या मारल्या आहेत. हा व्हिडीओ बघून तुमच्या अंगावरही काटा येईल.