Viral video: ‘शिकार करो या शिकार बनो’ हा जंगलात जगण्याचा नियम आहे. जर तुम्हाला शिकार करता येत नसेल तर सुरक्षित राहण्याची कला शिकून घ्यायलाच हवी.अन्यथा तुमची काही खैर नाही. जंगलात कोणीही सुरक्षीत नसतं. अगदी बिबट्यासुद्धा जंगलात प्रत्येक प्राण्याला त्याची स्वत:ची सुरक्षा करण्यासाठी खूप अलर्ट राहावं लागतं. आता विचार करा जर बिबट्या आणि कुत्रा समोरा-समोर आले तर काय होईल. तुम्ही म्हणाल बिबट्या कुत्र्याची सहज शिकार करेल..पण हाच तुमचा समज खोटा ठरवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आती तुम्हीच पाहा बिबट्या आणि कुत्रा समोरा-समोर आल्यावर नेमकं काय झालं.

शिकार करो या शिकार बनो

बिबट्यानं कुत्र्यावर झडप घातली तर कुत्र्याचं काय होईल, हे वेगळं सांगायची गरज नाही. मात्र या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, तो आला दबक्या पावलांनी आला खरा पण शेवटी कुत्र्याने बिबट्याला तेथून धूम ठोकण्यास भाग पाडले. सुरुवातीला बिबट्या आजूबाजूच्या सर्व परिस्थितीचा अंदाज घेताना दिसत आहे. यावेळी ३, ४ कुत्रे त्याठिकाणी झोपले आहेत. हेच पाहून बिबट्या हळू हळू पुढे येऊ लागला. कुत्रे तोपर्यंत निवांत झोपले होते. मात्र, क्षणात कुत्र्यांना भनक लागते आणि कुत्र्याचा प्रतिहल्ला बिबट्याला भारी पडला. यावेळी बिबट्याने पळ काढला हा हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

हर कुत्ता अपनी गली में शेर होता है

त्यामुळे हर कुत्ता अपनी गली में शेर होता है, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं..हा व्हिडीओ @Latestsightings नावाच्या युट्युब चॅनेलवर पोस्ट करण्यात आला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> संघर्षाचा आवज कधी ऐकलाय का? नवऱ्याच्या गरीबीत साथ देणाऱ्या ‘या’ महिलेचा VIDEO एकदा पाहाच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत असून यूजर्स कडून त्याला चांगलाचा प्रतिसाद दिला जात आहे. एका यूजर्सने तर कमेंटमध्ये लिहले की, तो घाबरला आहे पण त्याने भीतीपोटी विरोध करण्याचे धाडस केले. त्यामुळे कदाचित तो वाचला असेल. भीती वाटणे साहजिक आहे पण भीतीपोटी लढणे थांबवणे चूकीचे आहे. तर अनेकांनी बिबट्याला घाबरट म्हटले तर अनेकांनी कुत्र्याच्या हिमतीला दाद दिली.