Viral Video: जंगलातील प्राण्यांचा वावर मानवी वस्तीकडे वाढला आहे. त्यामुळे जंगली प्राणी कुठेही, कोणत्याही वेळी पहायला मिळतात. वन्य प्राणी मानवी वस्तीत आढळल्यावर सर्वत्रच खळबळ पहायला मिळते. प्राण्यांच्या दहशतीचे अनेक फोटो व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच यामध्ये आणखी एका व्हिडीओची भर पडली असून भयानक बिबट्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.
सोशल मीडियावर प्राण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये वाघाची दहशत असेल किंवा बिबट्याची दहशत. असे व्हिडीओ पाहून अनेकांना रात्री घराबाहेर पडण्याची भीती वाटते. पण जर रात्री अचानक तुमच्या समोर बिबट्या आला तर काय होईल हे देखील सांगणं कठीण आहे. बिबट्याला पाहिलं तरी अनेकांना घाम फुटतो. मग तो जवळ आल्यावर काय होईल याची कल्पना देखील कोणी करू शकत नाही. दरम्यान, असाच काही प्रकार रस्त्यावर झोपणाऱ्या एका व्यक्तीसोबत घडला आहे. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून त्या व्यक्तीचे पुढे काय झाले तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक व्यक्ती मध्यरात्री रस्त्याच्या कडेला बिनधास्त झोपला आहे. यावेळी त्याच्या आजबाजूला काही गुरं दिसत आहेत. अशातच एक बिबट्या दबक्या पावलांनी येतो आणि व्यक्तीवर हल्ला करण्याऐवजी तिथे असलेल्ल्या गायीच्या बछड्यावर हल्ला करतो. यावेळी आवाज ऐकून हा व्यक्ती जागा होतो आणि अगदी हुशारीनं बिबट्याला तिथून पळवून लावतो. या व्यक्तीवर बिबट्यानं हल्ला न करता व्यक्ती जागी होताच बिबट्या त्या व्यक्तीला काही न करता माघारी फिरला. सध्या याचाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ sagar.aher.10236 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एकानं म्हंटलंय की, देव तारी त्याला कोण मारी. संकटाच्या काळात शांत राहिलेलं कधीही चांगलच असते. तर एका नेटकऱ्याने त्याने जे केलं त्याला संयम आणि शांतता म्हणतात. म्हणून आयुष्यात हे दोन्ही असणं खूप गरजेचं आहे असं म्हटलं आहे.