Lioness Vs Leopard Fight Video: जंगलात सिंह हा ‘राजा’ मानला जातो, मात्र तितकाच धोकादायक आणि खतरनाक शिकारी म्हणजे बिबट्या. आपल्या चपळतेसाठी आणि गुपचूप शिकार करण्याच्या शैलीसाठी ओळखला जाणारा बिबट्या ‘सायलेंट किलर’ म्हणून प्रसिद्ध आहे. विचार करा, जेव्हा हे दोन भीषण शिकारी समोरासमोर आले, तेव्हा काय घडलं असेल?
सध्या सोशल मीडियावर एक थरारक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तंजानियाच्या जंगलात एक सिंहीण आणि बिबट्या यांच्यात जबरदस्त झटापट झाल्याचं दिसून येत आहे. या झटापटीत जीव वाचवण्यासाठी दोघांनी एकमेकांवर जी झडप घातली आहे, ती दृश्यं थरकाप उडवणारी आहेत. व्हिडीओच्या प्रत्येक सेकंदाला जीव अडकल्यासारखा वाटतोय… पण शेवटी काय झालं? कोणी मार खाल्ला, कोण वाचलं? उत्तर देणारा हा थरारक व्हिडीओ नक्की पाहाच!”
सामना दोन शिकाऱ्यांचा…
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बिबट्या आणि एक भयंकर सिंहीण एकमेकांशी भिडल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडीओच्या सुरुवातीस, सिंहीण बिबट्यावर झडप घालते आणि त्याला खाली पाडून शिकार करण्याचा प्रयत्न करते. पण, बिबट्या तितकाच खतरनाक ठरतो. जमीनवर पडल्यानंतरही त्याने हार मानलेली नसते. उलट तो आपल्या लवचिक आणि हलक्याफुलक्या शरीराचा वापर करत सिंहीणीवर जोरदार पलटवार करतो.
त्याच्या नख्यांचे वार इतके घातक असतात की, सिंहिणीला सावरायलाही वेळ मिळत नाही. फक्त १४ सेकंदांची ही घनघोर लढत पाहताना अंगावर शहारे येतात.
वेग विरुद्ध ताकद, शेवटी काय झालं?
या संघर्षात एकीकडे सिंहिणीची अफाट ताकद होती, तर दुसरीकडे बिबट्याची चपळता. पण, शेवटी या लढाईत विजयी ठरतो बिबट्या. तो सिंहिणीला चकवा देऊन तिच्या जबड्यातून निसटतो आणि वेगाने पळून जातो. सिंहीण त्याचा पाठलाग करते, पण तिच्या ताकदीपुढे बिबट्याची वेगवान हालचाल जास्त ठरते.
हा थरारक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @visit__tanzania या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे आणि आतापर्यंत त्याला ५० हजारांहून अधिक व्ह्युज मिळवले आहेत. नेटिझन्सही या जंगलातील थरारक संघर्षाचे भरभरून मनोरंजन घेत आहेत.
ही झटापट म्हणजे नुसतं युध्द नव्हे, तर जंगलातील जगण्यासाठीचा संघर्ष आहे. या दोन्ही शिकाऱ्यांच्या क्षमतेची, चातुर्याची आणि जिवंत राहण्याच्या इच्छेची ही परीक्षा होती.
येथे पाहा व्हिडीओ
एक गोष्ट मात्र नक्की, जंगलात जिंकतो तो, जो चपळ, हुशार आणि वेळेवर निर्णय घेणारा असतो.