Viral video: सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.

देशभरातील तापमान दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. पावसाळा सुरु असला तरीही उष्णताकाही कमी होताना दिसत नाहीये. घरात एसी असली तरीही लोक लाईट बिलचा विचार करत आहेत. पण काही हुशार लोकांनी या गरमीवर मात करण्यासाठी एका पेक्षा एक अतरंगी जुगाड शोधून काढले आहेत. अशातच आता आणखीन एक नवीन जुगाड सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे ज्यात एका व्यक्तीने एसीचं बिल वाचवण्यासाठी एक असा जुगाड केला की पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

एकीकडे सध्या हवामानात सतत बदल होत असल्याचं दिसत असलं तरी दुसरीकडे लोक एकापेक्षा एक जुगाड करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर असाच एक हटके व्हिडीओ समोर येत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात खोलीतील दृश्य दिसून येत आहेत. व्हिडिओमध्ये आपल्याला एक व्यक्ती दिसून येत आहे जो एक फळी फिरवतो आणि यावर एसी चिपकवल्याचे आपल्याला दिसून येते. खरंतर व्यक्तीने ही फळी दोन खोल्यांच्या मधोमध अशाप्रकारे चिपकवलेली असते की तिला फिरवताच एसी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत फिरवता जाते आणि याने फायदा असा होतो की आपल्याला हवं तेव्हा हव्या त्या खोलीत आपण एकाच एसीतून दोन खोल्यांमध्ये थंड हवेची मजा घेऊ शकतो. यासाठी दोन गोन एसी वेगेवगळ्या खोलीत आता लावायची गरज नाही. त्यामुळे लाईट बिलही वाचत आणि आपली बचतही होते..

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ viral_india.official या इन्स्टाग्रामवर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर कमेंट करून लोक मस्करी करत आहेत. एका यूजरने लिहिलं, वाहह एक नंबर, तर आणखी एकानं, हे फक्त भारतीयच करु शकतात असं लिहलं आहे.