Lions Attack Crocodile Video: सोशल मीडियाच्या दुनियेत कधी काय पाहायला मिळेल याचा काही भरवसा नसतो. काही व्हिडीओ असे असतात की, जे पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. सध्या इंटरनेटवर एक असा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात सिंहांची एक मोठी फौज मगरीवर हल्ला करते. पण पुढे ती जो उलटहल्ला घडते, ती पाहून प्रेक्षक थक्क होतात.

गर्द हिरव्यागार काठावर हलक्या पाण्यात शांतपणे पहुडलेली एक मगर… आणि दुरून येणाऱ्या सिंहाच्या डोळ्यांमध्ये भूक आणि आक्रमकता. क्षणात वातावरण तंग होतं, पाण्यात हलकीशी हालचाल होते आणि सुरू होतो जंगलातील थरार. काही सेकंदांतच हल्ल्याची तीव्रता एवढी वाढते की, पाहणाऱ्यांचे श्वास रोखले जातात. सुरुवातीला सिंहांच्या टोळीला विजय जवळ वाटतो; पण पुढच्याच क्षणी अशी बाजी पलटते की, ‘जंगलाचा राजा’ही मागे सरकतो. या लढतीचा शेवट नेमका कसा झाला, ते व्हिडीओ पाहिल्याशिवाय तुम्ही यावर विश्वास ठेवू शकणार नाही…

सिंह आणि मगर जंगलातील टक्कर

व्हिडीओमध्ये दिसतं की, एक खूप मोठी मगर हलक्या पाण्यात आडवी होऊन निवांतपणे पडलेली असती. तेवढ्यात तिच्यासमोर एक सिंह येतो. सुरुवातीला थोडा हलका सामना चालतो आणि अचानक ती लढत सुरू होते. सुरुवातीला मगर सावधपणे बचाव करते; पण सिंहही मागे हटत नाही. काही वेळातच इतर सिंहही मैदानात उतरतात. आता सिंहांची मोठी फौज मिळून मगरीवर जोरदार हल्ला चढवते. एक क्षण असा येतो की, पाहणाऱ्यांना वाटतं – आता मगर संपणार!

पण इथेच कथानकाला ट्विस्ट मिळतो. मगर अचानक जबरदस्त ताकदीने पलटवार करते. आपल्या प्रचंड जबड्यांच्या जोरावर ती सिंहांना मागे हटायला भाग पाडते. काही क्षणांतच सिंहांची पकड सैल होते आणि मगर त्यांना पाण्यापासून दूर हुसकावून लावते. जंगलातील ‘राजा’ म्हणून सिंहाची ओळख असली तरी या लढतीत मगरीनं सिंहांना कशी मात केली, ते पाहून प्रेक्षक थक्क झाले.

नेटिझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर एका युजरने शेअर केला असून, बातमी लिहेपर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. कमेंट्स विभागात लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “जंगलाचा राजा सिंह असतो, हे मी मानत नाही”. दुसऱ्याने म्हटलं, एकटा सिंह असता, तर तो मारला गेला असता”. तिसऱ्याने लिहिलं, “हीच आहे मगरीची खरी ताकद”.

येथे पाहा व्हिडीओ

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि जंगलातील या अद्भुत संघर्षाने प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणला आहे.