Real Hero Viral Video: आजच्या समाजात लोक नजरेसमोर अन्याय घडत असतानाही गप्प बसतात; पण एका लहानशा मुलानं जे केलं, ते अनेक प्रौढांनाही लाजवेल. शाळेच्या गणवेशातला हा छोटा ‘हीरो’ ना घाबरला ना थबकला… आणि एका मुलीचं आयुष्य कदाचित वाचवलं.
सुपरहीरो म्हणजे काय? मोठे मास्क, वेगळ्या कपड्यांतले शक्तिमान व्यक्तिमत्त्व? पण खरं तर, खरा हीरो ओळखून येत नाही, तो कृतीतून ओळखला जातो. असाच एक धक्कादायक व प्रेरणादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात एक छोटा मुलगा मोठ्या हिमतीनं एका छेड काढणाऱ्या तरुणाला त्याच्या जागी बसवतो.
ही घटना आहे एका शहरातील बसथांब्याची. सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतं की, एका तरुण मुलानं एका मुलीला त्रास देणं सुरू केलं आहे. तो तिला घाबरवत आहे, तिच्यावर चिडचिड करत आहे. ती मुलगी त्याच्यापासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे; पण भीतीमुळे ती आवाजही काढू शकत नाही आणि सर्वांत मोठी धक्कादायक बाब म्हणजे आजूबाजूला बसलेली माणसं गप्प आहेत. कोणी काहीच करत नाही. मुलगी भीतीनं गप्प होती, समाज नजरेचं भान विसरला होता… पण एक लहान मुलगा पुढे सरसावला आणि नायक बनला.
येतो खरा हीरो एक छोटा शाळकरी विद्यार्थी!
८-१० वर्षांचा हा मुलगा शाळेच्या गणवेशामध्ये बसलेला असतो. तो हे सगळं पाहतो आणि शांतपणे जवळच्या एका व्यक्तीकडून फोन घेतो. कुठलाही वेळ न घालवता, तो थेट १०० वर कॉल करतो आणि पोलिसांना घटनेची माहिती देतो. त्याची ही धाडसी कृती पाहून सर्वच थक्क होतात.
काही मिनिटांतच पोलीस घटनास्थळी पोहोचतात, त्या तरुणाला पकडून ताब्यात घेतात आणि मुलीला सुरक्षित ठिकाणी नेतात. नंतर पोलिस अधिकारी त्या मुलाकडे पाहतात आणि त्याला विचारतात, “काय झालं?” तेव्हा हा छोटा हीरो संपूर्ण गोष्ट अत्यंत निरागसपणे सांगतो. पोलिसांच्या नजरेतही त्या मुलासाठी आदर स्पष्ट दिसतो.
@nair_nandu08 या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला हा व्हिडीओ सध्या लाखोंच्या काळजाला भिडतोय. युजर्स भरभरून कौतुक करतायत, “अशाच मुलांमुळे समाजात अजूनही आशा आहे”, “हा मुलगा खरंच समाजासाठी आदर्श आहे”, “धाडस म्हणजे काय याचं हे उत्तम उदाहरण!”
येथे पाहा व्हिडीओ
ही घटना आपल्याला शिकवते की, वयानं नाही तर विचारांनी मोठं व्हायला लागतं. एखाद्या चुकीवर आवाज उठवणं हीच खरी नायकी. आज आपल्याला या छोट्या हीरोचा अभिमान वाटतो. अशा मुलांमुळेच समाजात परिवर्तनाची आशा निर्माण होते.