Viral video: सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओज हास्याने भरलेले असतात तर काही थक्क करणारे असतात. सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ सोशल मेडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लहान मुलं कधी निरागस तर कधी खोडकर असतात. अशा मुलांचे व्हिडीओ देखील सोशल मीडियावर शेअर केले जातात जे लोकांना पाहायला देखील आवडतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

शाळा ही मुलांची आवडती जागा असायला हवी. कारण तिथे अभ्यास तर असतोच पण त्यापेक्षा जास्त महत्वाचं म्हणजे मित्र मैत्रिणी मिळतात. गप्पा मारायला, खेळायला, डबा खायला मजा येते. अशी मजा घरात बसून मिळत नाही. असं असलं तरी काही मुलांना शाळेत जायचं, हीच एक चिंता वाटते. शाळेत जायची इच्छा नसते. अशाच एका शाळेत न जाता रानात गुर घेऊन गेलेल्या मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परिक्षेचं टेंशन आलेल्या या मुलानं असा डायलॉग मारला आहे की ऐकून तुम्हीही पोट धरुन हसाल.

या व्हिडीओमध्ये तु्म्ही पाहू शकता, हा मुलगा रानात उभा आहे, त्याच्यामागे एक म्हस आहे. यावेळी तो म्हणतो, “पास तर पास नायतर दोन म्हशी हायत, त्यांना घेऊन मोकाट जाणार, जास्त लोड घेत नाय” त्याचा हा बिनधास्तपणा पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय तर अनेकांना त्यांचं बालपण आठवलं आहे. गावाकडे लहान वयातच मुलांना गाई-गुरांना घेऊन रानात जावं लागतं, असाच हा मुलगा म्हशीला घेऊन रानात गेला होता तेव्हा हा व्हिडीओ काढला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही तुमच्या लहानपणीचे दिवस आठवतील.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आरारारा खतरनाक! ऊस असावा तर असा; ३७ कांड्यांवरती गेला शेतकऱ्याचा ऊस; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनाही नक्कीच आपलं हसू आवरता येत नसणार. हा मजेदार व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगाने व्हायरल होत आहे. @ts.creations_नावाच्या इन्स्टाग्राम हँडलवर ते शेअर करण्यात आले आहे. काही सेकंदांच्या या व्हिडीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत. नेटकरीतर या मुलाचे आणि त्याच्या शैलीचे फॅन झाले आहेत.