सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक फोटो आणि व्हिडीओंची चर्चा ही होतेच. यातील काही व्हिडीओ इतके प्रेरणादायी असतात की, ज्यातील व्यक्तींचे कौतुक केल्याशिवाय आपण राहू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर असाच एका चिमुकल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात चिमुकला देसी जुगाड करत मासे पकडताना दिसत आहे. त्यामुळे मासेमारी करणारा हा चिमुकला सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

मासेमारी करणं हे अवघड काम असतं. पाहताना सोपे वाटणारे हे काम तितकेच कंटाळवाणेही असते. कारण गळात जोपर्यंत मासा लागत नाही तोपर्यंत फक्त बसून वाट पाहावी लागते. पण एवढं करुनही एकचं मासा जेव्हा फिशिंग रॉडमध्ये अडकतो तेव्हा हे काम सर्वात थकवणारे वाटू लागते. पण सोशल मीडियावर व्हायरल होणारा चिमुकला एका जुगाडच्या मदतीने हे काम अगदी आरामात करताना दिसत आहे. जे पाहून युजर्सही अवाक् झाले आहेत.

सहसा अनेकजण नदी किंवा तलावाच्या काठावर मासेमारी करण्यासाठी दोरीला हुक लावत मासे अडकण्याची वाट पाहत असतात. अनेक वेळा जास्त जोर लावतात तेव्हा तार हातातून निसटते, यामुळे मासेही हाताला लागत नाहीत. या समस्येपासून सुटका मिळण्यासाठी व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या चिमुकल्याने अनोखी युक्ती केली आहे. ज्याच्या मदतीने तो तलावातील सर्वात मोठा मासाही सहज बाहेर काढू शकतो. व्हायरल व्हिडीओ ट्विटरवर ‘द बेस्ट’ नावाच्या पेजवरून ट्विट करण्यात आला आहे, जो अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही व्हायरल होत आहे.

या व्हिडीओमध्ये एक चिमुकला दिसत आहे. जो मासे पकडण्यासाठी दोन छोट्या लाकडी पळ्यांना पतंगीचा मांजा गुंडाळण्यासाठी ज्या पद्धतीची फिरकी असते, तशी फिरकी दोन्ही फळ्यांच्या मधोमध बसलेली आहे. त्या फिरकीमध्ये धागा गुंडाळलेला आहे. तो चिमुकला तलावाच्या काठावर ही लाकडी चौकट ठोकतो. ती चौकट जमिनीत अगदी घट्टपणे करतो मासे पडण्यासाठी गळाला तो पीठाचा मोठा गोळा अडकवतो आणि गळ पाण्यामध्ये टाकतो. त्यानंतर तो निवांत तलावाच्या काळावर बसून राहतो. यामुळे मासे पकडताना त्याला जास्त ताकद लावावी लागत नाही. अवघ्या दोन मिनिटांमध्ये त्याला गळाला दोन मासे लागल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे.

हेही वाचा : एकेकाळी फक्त मेकअपवर ३ कोटी खर्च करणारी ‘ही’ मॉडेल आली रस्त्यावर, करतेय ‘हे’ काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिमुकल्याचा हा देसी जुगाड अनेक युजर्सना आवडला आहे. बहुतेक युजर्सनी आता ते देखील असा जुगाडू तंत्र तयार करुन मासेमारी करतील असे सांगत आहेत. या व्हिडीओला आत्तापर्यंत २.४ मिलियनहून अधिक वेळा पहिले गेले आहे.