सोशल मीडियावर रोज नवनवीन अनेक गाण्यांवरील व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकीचं एक गाण म्हणजे, ”पाव्हणं जेवला काय?”. या गाण्याचे बोल ऐकून तुमच्या डोळ्यासमोर गौतमी पाटील नक्कीच आली असेल. या गाण्यावरील तिच्या अदा आणि नृत्याने अनेकांना वेडं लावलयं. पण सध्या हे गाणं गौतमी पाटीलमुळे नव्हे तर दोन चिमुकल्यांमुळे चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर दोन चिमुकल्या मुलींचा या गाण्यावर नाचतानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. चिमुकल्यांचे हावभाव आणि नृत्य इतके गोंडस आहे की तुम्ही गौतमी पाटीलला देखील विसरून जाल.

चिमुकल्यांनी नृत्यामध्ये दिली गौतमी पाटीला टक्कर

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दोन लहान मुली नऊवारी साडी परिधान करून सुंदर नटलेल्या दिसत आहे. दोघीही आपल्या गोंडस आवाजात हे गाणे म्हणत आहे आणि त्यावर सुंदर नृत्य देखील करत आहे. दोघींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहण्यासारखे आहेत. विशेष म्हणजे दोघींनाही गाण्याचे बोल तोंडपाठ आहेत. हा व्हिडीओ पाहून तुमच्या चेहऱ्यावर हसू नक्की येईल.

हेही वाचा – ‘बादल बरसा बिजुली’ गाण्यावर चिमुकल्याने केला जबरदस्त डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल त्याचे चाहते

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर mydreamgirl111 या अकांउटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेकांना तो आवडला आहे. अनेकांनी दोघींचे कौतूकही केले आहे.

हेही वाचा – लग्नापत्रिकेत नवरा-नवरीच्या नावासमोर लिहिली IIT डिग्री; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

”पाव्हणं जेवला काय?” हे गाणे नक्की कोणी गायले आहे?
”पाव्हणं जेवला काय?” हे गाणे जरी गौतमी पाटीलच्या लावणी नृत्यामुळे प्रसिद्धीस आले असले तरी हे गाणे गायिका राधा खुडे हिने गायले आहे तर प्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते यांनी हे गाणे लिहिले आहे. अवधूत गुप्ते यांनी युट्युबवरील अधिकृत चॅनेलवर तुम्ही हे गाणे पाहू शकता.