Father Daughter Viral Video: वडील अन् लेकीचं नातं हे जगातील सर्वात सुंदर नात्यांपैकी एक आहे. पुरूष इतरांसाठी कसाही असला तरी त्याचा आपल्या लेकीवर सर्वात जास्त जीव असते. लेक जेव्हा वडीलांच्या आसपास असते तेव्हा तिचा प्रेमळ, काळजी करणारी आणि गोंडस रूप पाहणे यापेक्षा वेगळा आनंद त्यांना कशातच मिळत नाही. इतरांसाठी तो कडक आणि रागीट व्यक्ती आहे, पण लाडक्या लेकीसाठी तो खूप शांत आणि प्रेमळ व्यक्ती असतात जे मुलीला तिच्या बालपणात साथ देतो. वडील त्याच्या मुलीसाठी ते काम करण्यास तयार होतो जे तो कदाचित इतर कोणासाठीही करणार नाही
वडील-मुलीचे नात पाहून भावूक झाले नेटकरी
जितकं प्रेम वडील मुलीवर करतात तितकंच प्रेम मुलगी वडीलांवर करत असते. ती वडीलांचे कष्ट पाहते, त्यांची तळमळ पाहते आणि वडीलांना नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करते. वेळ पडल्यास ती वडीलांसाठी आवडत्या वस्तूचा त्याग करण्यास देखील मागे पुढे पाहत नाही. आहे. हेच सिद्ध करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, एक मुलगी तिची आवडती बाटली पुन्हा सुपरमार्केटच्या रॅकवर ठेवते कारण तिचे वडील म्हणतात की,”ती महाग आहे.”
महाग असल्याचं कळल्यावर मुलीने दाखवला समजूदारपणा (Girl’s mature act after knowing the price)
sia_3vedi नावाच्या वापरकर्त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या वडिलांबरोबर सुपरमार्केटमध्ये आल्याचे दिसते. तिथे तिला एक सुंदर बाटली दिसते. तिलाही ती खूप आवडतेय तिच्या वडिलांना बाटली खरेदी करण्यास सांगते. ती वडीलांना त्यांची किंमत पाहण्यास सांगते. वडील जेव्हा ही बाटली खूप महाग आहे आपण नाही घेऊ शकणार सांगतात तेव्हा पुढच्या क्षणी पाण्याची बाटली रॅकवर ठेवते आणि तिला ती बाटली नको आहे असे सांगते. मुलगी वडीलांना सांगते की पगार झाल्यावरतिला दुसरी बाटली घ्या जी स्वस्त असेल.
वडील-मुलीचं नातं दाखवणारा व्हिडिओ व्हायरल (Father-daughter emotional bond goes viral)
नेटकऱ्यांची भावनिक प्रतिक्रिया, व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव (Netizens react emotionally to viral video)
इंस्टाग्रामवर पोस्ट केलेला हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पोस्ट झाल्यापासून लाखो वापरकर्त्यांनी व्हिडिओ पाहिला आहे. एक लाखाहून अधिक वापरकर्त्यांनी व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, वापरकर्त्यांनी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेतत. चिमुकलीचा निरागसपणा आणि समजूदारपणा पाहून नेटकरी थक्क झाले आहेत.
मुलीच्या समजूतदारपणावर नेटकऱ्यांनी दिली मनापासून दाद (Internet praises daughter’s empathy and innocence)
व्हिडिओवर कमेंट करताना एका वापरकर्त्याने म्हटले की, “मुलांना हे समजावून सांगणे महत्वाचे आहे की,”त्यांना आवडणारी प्रत्येक गोष्ट खरेदी करणे आवश्यक नाही, त्यांना पैशाचे मूल्य समजावून सांगावे लागेल. तरच ते पुढे जातील आणि पैशाचे मूल्य समजतील. या व्हिडिओमध्ये आपण हेच समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे.” दुसरा वापरकर्ता म्हणाला, “अत्यंत गोंडस मुलगी आहे. तिला ती बाटली घेऊन द्या आमच्याकडून”
तिसरा म्हणाला “तुमची मुलगी अगदी परी सारखी आहे. माझी मुलगीही ५ वर्षांची आहे. अत्यंत समजूतदार आहे. मुलगी या देवाने दिलेली भेट आहे. चौथा म्हणाला की, मुली लहानपणीपासून समजूतदार असतात. माझी मुलगी देखील अशीच आहे.”