Little Girl Dance Viral Video: सोशल मीडियावर दररोज डान्सचे शेकडो व्हिडीओ व्हायरल होत असतात; पण काही परफॉर्मन्स असे असतात की, जे मनाला भिडतात आणि लक्षात राहतात. अगदी तसंच घडलंय एका छोट्याशा मुलीबरोबर, जिनं आपल्या गोड नृत्यानं सध्या नेटकऱ्यांची मनं जिंकलेली आहेत. तुम्हाला आठवतंय का करीना कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘जब वी मेट‘? त्यातली ‘गीत’ ही खट्याळ, खोडकर आणि हटके व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. त्याच ‘गीत’ची आठवण करून देणारा हा भन्नाट व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मीडियावर मुलांच्या डान्स व्हिडीओंची अक्षरशः भरमार आहे. पण, कधी कधी एखादा व्हिडीओ असा येतो, की तो पाहून लोक थक्क होतात. अगदी असाच एक भन्नाट व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यात एक छोटी मुलगी शाहिद कपूर आणि करीना कपूरचा सुपरहिट चित्रपट ‘जब वी मेट’मधील गाणं ‘ये इश्क हाय’वर अप्रतिम डान्स करताना दिसते. तिच्या डान्सनं नेटकऱ्यांची मनं अक्षरशः जिंकली आहेत.
लाल स्कर्ट आणि कॉर्सेट टॉपमध्ये सजलेली ती मुलगी लहानग्या ‘गीत’सारखीच दिसते. तिच्या चेहऱ्यावरील भाव, तिची नृत्याची अंगभूत लय व तिच्या छोट्या पावलांमधला ताल पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. खरंच, हा डान्स बघताना असं वाटतं, जणू ‘जब वी मेट’मधली करीना पुन्हा समोर येऊन नाचतेय.
हा व्हिडीओ बरकत अरोरा हिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. बरकत ही आधीपासूनच सोशल मीडियावर चर्चेत असलेली डान्सर असून, तिनं सुपर डान्सर चॅप्टर ५ सारख्या रिअॅलिटी शोजमध्ये धमाल केली आहे. तिचं नृत्यकौशल्य आणि चेहऱ्यावरील अभिव्यक्ती यांमुळे ती अनेकांच्या पसंतीस उतरली आहे.
जशीच ती ‘ये इश्क हाय’ गाण्यावर नाचायला सुरुवात करते, तसतसे तिचे कोरिओग्राफरही तिच्यासोबत सामील होतात. प्रेक्षकांचा उत्साह उसळतो, टाळ्यांचा कडकडाट सुरू होतो आणि सगळं वातावरण भारून जातं.
नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अक्षरशः कौतुकांचा पाऊस पाडलाय. एकानं लिहिलं, “आजवरचा सगळ्यात गोड डान्स पाहिला.” दुसऱ्यानं कमेंट केली, “मनमोहक!”, तिसऱ्यानं तर थेट लिहिलं, “अभिव्यक्ती जबरदस्त आहे.” चौथा म्हणाला, “विश्वास बसणार नाही इतका सुंदर डान्स.”
येथे पाहा व्हिडीओ
या लहानग्या कलाकाराच्या नृत्यानं सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय. प्रश्न असा– तुम्ही हा डान्स पाहिला की नाही अजून? पाहिल्यावर तुमचं मत काय आहे? खरंच ही मुलगी पुढची ‘छोटी करीना’ ठरणार का? तुमचं उत्तर नक्की कमेंट करून सांगा!