असे म्हणतात की, मुलांना अगदी लहान वयापासून एखाद्या गोष्टीची सवय, गोडी लावली की ते पुढे जाऊन त्यामध्ये पारंगत होतात. म्हणून अनेक पालक त्यांच्या मुलांना अगदी तीन, चार वर्षांचे असल्यापासूनच गाण्याची, नृत्याची शिकवणी लावतात. काही जण कराटे, पोहणे किंवा चित्रकला यांसारख्या गोष्टी शिकवण्यावर भर देतात. पाश्चात्त्य देशांमध्ये तर अगदी एका वर्षाच्या मुलांनाही पोहायला शिकवतात. अशातच एका चिमुकल्याला लहान वयापासूनच ट्रेकिंग आणि क्लायम्बिंगची आवड असल्याचे व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमधून दिसते.

ट्रेकिंग म्हणजे डोंगर, गड-किल्ल्यांवर पायी चढून जाणे. निसर्गाचा आस्वाद घेत, गड-किल्ल्यांच्या शिखरापर्यंत अडथळे पार करीत पोचण्याचा साहसी प्रवास म्हणजे ट्रेकिंग, अशी काहीशी त्याची व्याख्या करता येऊ शकते. आपल्यातील अनेक मंडळी पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी जातसुद्धा असतील. काही केवळ छंद म्हणून हे करतात; तर काही ट्रेकिंग प्रशिक्षक म्हणून यात पूर्णवेळ काम करतात. अशात सोशल मीडियावर एका चिमुकल्या ट्रेकरचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Viral Video Woman
“हाय गर्मी!”, कडक उन्हात तापलेल्या रस्त्यावर तरुणीने अंड्याचं बनवलं ऑम्लेट, Viral Video पाहून नेटकरी चक्रावले
The car was taken over the body of a sleeping dog
माणुसकीचा अंत! झोपलेल्या कुत्र्याच्या अंगावरून नेली गाडी अन् पुढे जे घडलं… Viral Video पाहून नेटकरी संतप्त
a young boy click family photo with statues at cloth shop
VIDEO : “आजन्म सिंगल!” चक्क दुकानासमोर लावलेल्या पुतळ्यांबरोबर काढला परफेक्ट फॅमिली फोटो, व्हिडीओ व्हायरल
Video: Canara, Bandhan Bank Officers Abuse Staff Over Targets
“अरे खड्ड्यात गेलं तुमचं कुटुंब” टार्गेट पूर्ण न केल्यानं बँक मॅनेजरची शिवीगाळ; मिटींगचा VIDEO झाला व्हायरल अन्…
Viral video of a monkey eating a plate sitting on a table chair
माकडाचा राजेशाही थाट! टेबल खुर्चीवर बसून ताटात जेवणाऱ्या माकडाचा Video Viral
rbi lifts bajaj finance restrictions on digital loan disbursement
बजाज फायनान्सच्या डिजिटल कर्ज वितरणावरील निर्बंध मागे
A young man helped crying dog
माणुसकी अजूनही जिवंत! अंधाऱ्या जागेत अडकलेल्या श्वानाला तरुणाने अशी केली मदत; युजर्स म्हणाले…
Indonesian volcano erupts for second time viral video
बापरे! पुन्हा झाला ज्वालामुखीचा उद्रेक! Video मधील दृश्य पाहून तुमच्याही छातीत भरेल धडकी!

हेही वाचा : Viral video : थंडी सोसत नाही म्हणून चालत्या रेल्वेत केली ‘शेकोटी’! व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा.

या व्हिडीओमध्ये अयान तैल-बैला हा अवघड गड क्लायम्बिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या दोरीच्या साह्याने चढत असल्याचे आपण पाहू शकतो. तेव्हा अयानने तिथल्या एका प्रशिक्षकाला, “हात सुटला, तर पडणार नाही ना,” असा थोड्याशा भीतीने सुरुवातीला प्रश्न केला. मात्र, नंतर तो अगदी बिनधास्तपणे लहान लहान पावले टाकत त्या प्रशिक्षकापर्यंत पोहोचल्याचे पाहू शकतो.

अयान चौरेचे नाव ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये लहान वयोगटातील सर्वांत जलद गतीने कळसूबाईचे शिखर सर करण्यासाठी नोंदवले गेले आहे. अयानने एक तास ५४ मिनिटांमध्ये हा ट्रेक पूर्ण केल्याचे त्याच्या @ayaan_chaure या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून समजते. कळसूबाई हे महाराष्ट्रातील सर्वांत उंच पर्वतशिखर असून, त्याची उंची ५,४०० फूट इतकी आहे.

सोशल मीडियावर अयानचा हा भन्नाट व्हिडीओ शेअर झाल्यावर नेटकऱ्यांनी या चिमुकल्या ट्रेकरचे खूप कौतुक केले आहे. काय आहेत त्यांच्या प्रतिक्रिया पाहा.

“मुलाच्या धाडसाइतकेच बापाच्या काळजाचेही कौतुक करायला हवे,” असे एकाने म्हटले आहे. “नाही पडणार बाळा तू. कारण- तू राजांचा मावळा आहेस! जय जिजाऊ आऊसाहेब… जय शिवराय… जय शंभुराजे बाळा,” असे दुसऱ्याने लिहिले आहे. तिसऱ्याने, “या वयात हे साहस…. बाळा तुला उदंड आयुष्य लाभो,” असे म्हणून आशीर्वाद दिला आहे. चौथ्याने, “प्रत्येक आई-वडील जेव्हा आपल्या मुलांना इतिहास वाचायला नाही, तर जगायला शिकवतील तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे शेजारच्या घरात नाहीत, तर आपल्याच घरात जन्म घेतील, असं समजायचं,” असे लिहिले आहे. शेवटी पाचव्याने, “आतापर्यंतचा इन्स्टाग्रामवरचा सगळ्यात चांगला व्हिडीओ आहे हा,” असे लिहिले आहे.

हेही वाचा : सामाजिक बंधने झुगारून माउंट एव्हरेस्ट सर करणारी ‘पहिली भारतीय महिला’; पाहा कसा झाला या गिर्यारोहकाचा प्रवास…

@maharashtra_desha या इन्स्टाग्राम पेजने शेअर केलेल्या या व्हिडीओवर आतापर्यंत १.४ मिलियन व्ह्युज आणि १२९K इतके लाइक्स आलेले आहेत.