लोकसत्ता डॉट कॉम आणि युनिसेफ यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या ‘घरीच राहा, सरक्षित राहा’ या चिमुकल्यांसाठीच्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला आहे. लॉकडाउनच्या काळात चिमुकल्यांच्या छोट्याशा डोक्यातून भन्नाट कल्पना बाहेर आल्या आहेत. या स्पर्धेत जवळपास साडेतीन हजार चिमुकल्यांनी सहभाग घेतला. यापैकी १०० मध्ये कोणाची निवड झाली आहे, त्यापैकी २५ जणांची नावं आज जाहीर करण्यात येत आहेत.
आलेल्या स्पर्धकांमधून १०० जणांची निवड ही डिजिटल प्रमाणपत्रासाठी करण्यात आली आहे. त्यानुसार या शंभर जणांपैकी २५ जणांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. या २५ जणांनी साकारलेल्या कलाकृती आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://loksatta.com/) फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील.
गुरूवारी २५ जणांची नावं जाहीर होतील. शुक्रवारी आणि शनिवारी आणखी २५-२५ जणांची नावं जाहीर करण्यात येणार आहेत. त्यांच्या कलाकृतीही त्या-त्या दिवशी आपल्याला लोकसत्ता डॉट कॉम या वेबसाइटवर (https://loksatta.com/), फेसबुक पेजवर (Loksattalive) आणि टि्वटरवर (Loksattalive) पाहता येतील. त्यानंतर रविवारी या शंभर जणांपैकी पहिल्या पाच जणांची (Top 5) यादी जाहीर करण्यात येईल. त्यासाठी https://loksatta.com/ आणि लोकसत्ताच्या फेसबुक पेजला भेट द्यायला विसरू नका.
शंभरपैकी २५ जणांची यादी ही अशी
- आरुषी प्रवीण भोईटे
- ध्रुव गणेश कोरगावकर
- तनय विजय जाधव
- इशान योगेश संघवी
- लक्ष्य किरण सोनावणे
- सार्थक महेश पवार
- आस्मी मंदार एदलाबादकर
- अमृता आनंदा लाड
- वेदांत गुराम
- आर्या नितीन नावार
- स्वरांगी पाटील
- आलिशा मन्सूर मुजावर
- तनिष्का सोनवणे
- भाग्यश्री किशोर जंगम
- सोहम विनय कुलकर्णी
- विश्व रविंद्र वाकळे
- अर्जुन सचिन दरेकर
- ईशा प्रकाश पवार
- श्रावणी समीर निलंगे
- रिद्धी नाईक
- आकांक्षा डी. हिबारे
- आरुषी श्रीकांत हांडे
- प्रांजल हट्टी
- जयेश जगदिश सावंत
- माधव राजेशकुमार रावळ
निवड झालेल्या सर्व १०० स्पर्धकांना लवकरच डिजिटल प्रमाणपत्र ई-मेलद्वारे पाठवण्यात येणार आहे.