Haryana youtuber jyoti malhotra viral images: पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सहा जणांना हरियाणामधून अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये यूट्यूबर ज्योती मल्होत्रा हिचा समावेश आहे. ज्योतीला हिसारच्या सिव्हिल लाइन्स पोलिसांनी अटक केली असून, तिच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ती पाकिस्तानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, असा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला आहे. ज्योती मल्होत्रा ऊर्फ ज्योती रानी यूट्यूबवर ट्रॅव्हल विथ जो, असे तिच्या यूट्यूब चॅनेलचे नाव आहे. तिने दोन वेळा पाकिस्तानलादेखील भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता तिच्या चौकशीच्या अहवालांमध्ये, सोशल मीडियावर दोन फोटो मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत. एका फोटोमध्ये तिने भाजपाच्या टोपीसह स्कार्फ घातल्याचे दिसते आणि दुसऱ्यामध्ये आपची. मात्र तपासादरम्यान, आम्हाला आढळले की दोन्ही फोटो एआय-जनरेटेड आहेत.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर अकिफ अली सिद्दीकी याने त्याच्या एक्स अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे.

इतर वापरकर्ते देखील समान दाव्यांसह हा फोटो शेअर करत आहेत.

हाच फोटो शेअर करीत असाही दावा केला जात आहे की, यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा ‘आप’शीही संबंध आहे.

तपास –

आम्ही हे फोटो तपासले तेव्हा अनेक फोटो हे एकसारखेच दिसत होतो, ज्यावरून आम्हाला असे वाटले की, हे फोटो AI-जनरेटेड असू शकतात.

आम्ही आधी अनेक फोटो AI डिटेक्टरला पाठवले. त्यावेळी HIVE मॉडरेशनने असे सूचित केले की, हे फोटो AI-जनरेटेड होते.

wasitai.com ने देखील स्पष्ट केले की हे फोटो AI टूल वापरून तयार केले गेले आहेत.

isitai.com ने देखील रिझल्ट दाखवले की, हा फोटो AI वापरून तयार केला गेला होता.

त्यानंतर आम्ही दुसऱ्या एआय फोटोवर डिटेक्टर वापरून तपासणी केली.

ज्योती आपसमर्थक म्हणून दाखविल्या जाणाऱ्या फोटोहीबाबतही आम्हाला असेच रिझल्ट दिसून आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निष्कर्ष: भाजपा आणि आपसमर्थक म्हणून हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केल्या गेलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राचे हे फोटो बनावट व एआय-जनरेटेड आहेत.