Pahalgam Terror Attack Fact Check : जम्मू-काश्मीरमधील पोलिस कारवाईचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. या व्हिडीओसह असा दावा केला जात आहे की, पहलगाममध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या स्थानिक नेत्यांना पोलिसांनी अटक केली आहे. पण, खरंच पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीर पोलिसांनी अशी कोणती कारवाई केली का? आणि व्हिडीओतील फुटेज त्याच घटनेचे आहे का? याविषयीचे सत्य जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
इन्स्टाग्राम युजर पुष्पराज राणा यांनी त्यांच्या अकाउंटवर दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह व्हायरल व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करत आहेत.


तपास:
आम्ही InVid टूलवर व्हिडीओ अपलोड करून तपास सुरू केला आणि त्यातून मिळालेल्या की फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केला.
यावेळी आम्हाला २७ नोव्हेंबर २०२४ रोजी amarujala.com वर पोस्ट केलेल्या व्हिडीओची पोस्ट आढळली.
या पोस्टमध्ये म्हटले आहे (अनुवाद) : सोमवारी, कटरा येथे रोपवे प्रकल्पाच्या निषेधार्थ निदर्शकांनी दगडफेक केली, त्यानंतर पोलिसांनी गोडा पिठू आणि निषेधात सहभागी असलेल्या त्यांच्या समर्थक नेत्यांना अटक केली. हे निदर्शक रोपवे प्रकल्पाविरुद्ध नाराजी व्यक्त करत होते, यावेळी ते हिंसक कृत्य करत होते. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि प्रमुख नेते गोडा पिठू यांच्यासह अनेक नेत्यांना अटक केली. या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई केली.
आम्हाला याबद्दल काही बातम्यादेखील आढळल्या.
आम्हाला डिसेंबर २०२४ चा व्हिडीओदेखील सापडला.
आम्हाला पाच महिन्यांपूर्वी अपलोड केलेल्या घटनेबद्दल काही व्हिडीओ रिपोर्टदेखील सापडले.
या व्हिडीओवरील वर्णनात असे म्हटले आहे : कटरा शहरातील वैष्णोदेवी मंदिरापासून प्रस्तावित रोप वे लाईनला विरोध करणाऱ्या पोलिस आणि व्यापाऱ्यांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर जम्मूच्या कटरा येथे दोन कामगार संघटना नेत्यांना अटक करण्यात आली.
आम्हाला शेअर केला गेलेला मूळ व्हिडीओ अलीकडील असल्याचे आढळून आले. हा व्हिडीओ पाच महिन्यांपूर्वी Jmmu Links News या YouTube चॅनेलने पोस्ट केला होता.
निष्कर्ष :
कटरा येथे दोन कामगार संघटना नेत्यांना अटक केल्याचा जुना व्हिडीओ आता अलीकडे झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी जोडून व्हायरल केला जात आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.