AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. या नव्या तंत्राच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. AI च्या मदतीने कलाकार डिजिटल माध्यमामध्ये काम करत कलाकृती तयार करत आहेत. सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये अनेक ऐतिहासिक जागा, महत्त्वपूर्ण लोकांचा समावेश असल्याचे दिसते. अगदी खरे वाटणारे फोटो या तंत्राद्वारे बनवले जात आहे. काही दिवसांपूर्वी ताजमहाल या जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या आश्चर्याच्या निर्मितीदरम्यानचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोप्रमाणे आर्टिफिशल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या एका फोटोची सर्वत्र चर्चा आहे.

भगवान रामचंद्रांचा AI द्वारे निर्मित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राम २१-२२ वर्षांचे असताना कसे दिसत असतील असा विचार करत हा फोटो तयार करण्यात आला आहे असे म्हटले जात आहे. या फोटोमध्ये प्रभू राम यांच्या चेहऱ्यावर तेज आणि स्मितहास्य पाहायला मिळत आहे. अनेकांनी हा डिजिटल फोटो त्यांच्या अकाउंटवर शेअर केला आहे. त्यांनी ‘रामचंद्र २१ वर्षांचे असताना असे दिसत असतील’ अशा प्रकारचे कॅप्शन्स या फोटोला दिले आहेत. रामचंद्रांच्या मनमोहक रुपाचे यूजर्सनी वर्णन केले आहे.

आणखी वाचा – ताजमहालचे कधीही न पाहिलेले फोटो पाहिले का? AI ने दिली इतिहासात डोकावण्याची संधी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे डिजिटल चित्र तयार करणाऱ्या कलाकाराची माहिती अद्याप गुलदस्त्यात आहे. नेटकऱ्यांनी रामाचा फोटो तयार करणाऱ्या कलाकाराचे खूप कौतुक केले आहे. एका यूजरने या फोटोला वाल्मीकी रामायण आणि रामचरितमानससह अनेक ग्रंथांमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वयवर्ष २१ असताना भगवान रामांचे AI निर्मित चित्र असे म्हटले आहे. तर दुसऱ्या यूजरने फोटोला उद्देशून ‘पृथ्वीवर रामांपेक्षा सुंदर पुरुष नाही’ अशी कमेंट केली आहे.