Viral Couple Dance Video: कधी कधी प्रेम व्यक्त करायला वयाचं बंधन नसतं, पण समाजातले “चार लोक काय म्हणतील?” हे वाक्य अनेकांच्या आनंदावर पाणी फेरतं. मात्र, एका काका-काकूंनी हे सगळं विसरून प्रेमाचा जल्लोष साजरा केला आणि त्यांचा हा भन्नाट डान्स पाहून सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. ‘मेरे कॉलेज की लड़की’ या गाण्यावर रंगलेला त्यांचा मॅचिंग ड्रेसमधला उत्साह, हातात हात घेऊन व्यक्त केलेलं प्रेम आणि बिंधास्त स्वभाव पाहून यंगस्टर्सही मान खाली घालतील. या व्हिडीओवर लोक अक्षरशः फिदा झाले असून याला लाखो व्ह्युज मिळवत तो सध्या सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओने सगळ्यांना दाखवून दिलंय की, वय काहीही असो… प्रेम आणि मस्ती कधीही थांबवू नये!
मंचावर उधळला रोमान्सचा पाऊस
इन्स्टाग्रामवर शेअर झालेल्या या व्हिडीओमध्ये एक काका-काकू एका हळदीच्या कार्यक्रमात धमाल करताना दिसतात. ‘मेरे कॉलेज की लड़की’ या गाजलेल्या गाण्यावर ते दोघे मस्तपैकी डान्स करतायत आणि सगळ्यांसमोर उघडपणे त्यांचे प्रेम व्यक्त करत आहे हे दिसून येते.. सर्वात भन्नाट गोष्ट म्हणजे दोघांनीही मॅचिंग कपडे घातलेत, ज्यामुळे त्यांच्या केमिस्ट्रीचा चारचौघांत विषय झालाय. दोघांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि कमाल स्टेप्स पाहून प्रत्येकणाच्या पसंतीस काका-काकूंचा डान्स आलेला आहे.
“लोक काहीही बोलोत… आम्ही डान्स करणारच!”
व्हिडीओत स्पष्ट दिसतंय की, त्या कपलला ‘चार लोक’ काय म्हणतील याची काहीच पर्वा नाही. अनेकदा आपल्याला समाजाच्या नजरेत चांगलं दिसण्यासाठी आपल्या मनातील आनंद दाबावा लागतो, पण हे कपल मात्र त्या चौकटी मोडून उघडपणे जगतंय.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्येही लिहिलं आहे – “कौन दुनिया और कौन ४ लोग” आणि त्याच वाक्याने इंटरनेटवर चर्चेला पेटवून दिलं आहे.
व्हायरलचा कहर!
हा व्हिडीओ सोशल मीडियावर २१ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाईक करून कपलच्या उत्साहाचं कौतुक केलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोकांनी अनेक प्रतिक्रिया केलेल्या आहेत. “या वयात प्रेम जपणं ही मोठी गोष्ट आहे”, “लोक काहीही बोलोत, प्रेम करणं कधी थांबवू नका” हा व्हिडीओ फक्त डान्सचा नाही, तर एक मोठा संदेश देतो – आपल्या आनंदासाठी, आपल्या प्रेमासाठी आणि आपल्या मनासाठी… लोकांच्या भीतीशिवाय जगा!