शेंगदाणे आणि गूळ पावडर भारतात बहुतेक घरांमध्ये सहज उपलब्ध होते. हे आरोग्यासाठी चांगले मानले जाते कारण त्यात प्रथिने, तेल आणि फायबर भरपूर प्रमाणात आहेत, परंतु तुम्ही कधी हे चिक्की तयार करतानाचा व्हिडीओ पाहिला आहे का? सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो पाहिल्यानंतर तुम्ही चिक्की खाण्यापूर्वी नक्कीच १०० वेळा विचार कराल.

एका कारखान्यात चिक्की बनवली जात असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. शेंगदाणे आणि गुळाच्या मिश्रणाचे छोटे तुकडे केले जात आहे. मग हे तुकडे एका फ्रेममध्ये ठेवून जमिनीवरच सरकवले जात आहेत. यानंतर फरशीवरच चिक्कीला आकार देण्यात आला. मात्र, चिक्की बनवण्याची ही प्रक्रिया के पाहून लोकांना आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे

एवढेच नाही तर कर्मचाऱ्यांच्या हातात हातमोजे नाहीत, फरशीवर कोणतेही भांडी किंवा प्लास्टिक ठेवलेले नाही. त्यामुळे चिक्कीमध्ये तयार करताना सर्व काम थेट फरशीवर सुरु आहे. चिक्की बनवताना स्वच्छतेच्या अभावामुळे हा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांकडून अनेक प्रतिक्रिया येत आहेत.

हेही वाचा – तरुणीने चक्क विणेवर सादर केली ‘आमच्या पप्पांनी आणला गणपती’ गाण्याची धून, तिचे गोंडस हास्य अन् मोहक हावभाव एकदा पाहाच

व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया

एकाने लिहिले, ‘आता मी बाजारातून विकत घेणार नाही, तर घरी बनवणार आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘मी हे सर्वात जास्त खातो पण आता कसे खाणार, मला इच्छाच नाही होणारनाही.’ ‘जर एखाद्या गोष्टीमध्ये केमिकल मिसळले तरी लोकांना ते खूप आवडते, परंतु यामध्ये स्वच्छतेची काळजी घेतली गेली नाही.’ असे एकाने लिहिले. तर साक्षीने लिहिले, ‘मला नेहमी प्रश्न पडतो की ही चिक्की इतकी चविष्ट का लागते?

हेही वाचा – तुम्ही केसांना तेल नेहमीच लावता, कधी तूप लावून पाहिले आहे का? केस होतील लांब, दाट आणि मऊ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसऱ्याने लिहिले, ‘ही खरी चव आहे.’ दुसऱ्याने लिहिले, ‘हा व्हिडिओ समोर आला तेव्हा मी चिक्की खात होतो. खरं तर, मी ते बाजूला ठेवले आहे.’ उमेशने लिहिले, ‘नवरात्र येणार आहे, आम्ही याच्या मदतीने उपवास करणार होतो पण आता आम्ही काय करणार?’ एकाने लिहिले, ‘यात काही चुकीचे नाही,फरशी साफ आहे. देसी गोष्टी अशाच बनवल्या जातात. ते खाऊ शकतो. मात्र, स्वच्छतेकडे थोडे लक्ष दिले पाहिजे.