मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये विद्युत विभागाच्या एका मोठ्या चुकीमुळे एका व्यक्तीची प्रकृती खालावली. घराचं आलेलं वीज बिल पाहून या व्यक्तीला इतका मोठा धक्का बसला की त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. खरं तर, ग्वाल्हेरमध्ये मध्य प्रदेश सरकारद्वारे चालवल्या जाणार्‍या वीज कंपनीने एका कुटुंबाला घराचं वीज बिल चुकीचं पाठवलं. ज्यामध्ये ३,४१९ कोटी रुपयांची रक्कम छापलेली पाहून ती व्यक्ती आजारी पडली.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांना दुमजली घराचं वीज बिल ३,४१९ कोटी रूपयांचे आल्याचं सांगण्यात येत आहे. मोबाईलवर बिलाचा मेसेज येताच सुरुवातीला काही तरी चूक असेल असे कुटुंबीयांना वाटले, मात्र ऑनलाइन तपासले असता तेवढीच रक्कम दिसली. त्यानंतर घरमालक महिला आणि तिच्या सासऱ्यांचा रक्तदाब वाढला. दोघांना दवाखान्यात न्यावे लागले. हे पाहून सासरे आजारी पडले. विभागाने तपासणी केली असता वीज कर्मचाऱ्याने बिलाच्या रकमेत मीटर रिडींगऐवजी सेवा क्रमांक भरल्याचे आढळून आले. त्यानंतर हे बिल तयार झाले.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चीनमध्ये घोंघावतंय पिवळं विनाशकारी वादळ? भितीदायक शिट्ट्यांच्या आवाजाने उडेल थरकाप!

सध्या मध्य प्रदेश सरकार चालवत असलेल्या वीज कंपनीने त्यांच्याकडून चूक झाल्याचं स्वीकारलं आहे. तसंच शहरातील शिव विहार कॉलनीतील गुप्ता कुटुंबीयांना दिलासा देत त्यांना १३०० रुपयांचे योग्य बिल जारी करण्यात आले आहे.

आणखी वाचा : ‘या’ रेसॉर्टमध्ये तुम्हाला सकाळी झोपेतून जागे करण्यासाठी रिसेप्शन कॉल नव्हे तर हत्ती येतात! पाहा हा VIRAL VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

MPMKVVC ने या प्रकरणाची दखल घेत नंतर बिल दुरुस्त केले आणि त्यांचे योग्य बिल १३०० रुपये कुटुंबाला दिले. या प्रकरणात, एमपीएमकेव्हीव्हीसीचे महाव्यवस्थापक नितीन मांगलिक यांनी वीज बिलात छापलेल्या मोठ्या रकमेसाठी मानवी त्रुटीचा ठपका ठेवत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आल्याचे सांगितले. तसेच कनिष्ठ अभियंत्यांना नोटीस बजावली आहे.