Mann Ki Baat Magical Timing: शांत सकाळ आणि रेडिओवर ‘मन की बात’ सुरू असते… पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्ष्यांच्या संवेदनशीलतेबद्दल बोलत असतात… आणि तेवढ्यात, काहीसं चमत्कारिक घडतं. गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खाउंटे हे मोदींचं भाषण शांतपणे ऐकत असतानाच एक पक्षी आकाशातून थेट येतो आणि त्याच्या खांद्यावर येऊन बसतो जणू निसर्ग स्वतः हजेरी लावत असतो. हे क्षण इतके अनपेक्षित, इतके भावस्पर्शी होते की उपस्थित प्रत्येकाला क्षणभर वाटलं ही फक्त योगायोगाची गोष्ट नव्हे, ही निसर्गाची भाषाच होती. त्या क्षणाची व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून, लाखो लोकांनी या विलक्षण प्रसंगाला ‘प्रकृतीचा आशीर्वाद’ म्हणत दाद दिली आहे. पण, नेमकं काय घडलं? तो पक्षी कोणता होता? आणि पंतप्रधान मोदी त्या वेळी काय बोलत होते? जाणून घ्या सविस्तर कारण ही गोष्ट आहे, जी तुमच्या हृदयालाही भिडेल…
कधी कधी निसर्ग अशा घटना घडवतो की त्याला ‘योगायोग’ म्हणणंही अपुरं वाटावं. अशीच एक अनोखी, हृदयाला भिडणारी आणि मन थक्क करणारी घटना घडलीय गोव्यात, जी सध्या सोशल मीडियावर जबरदस्त चर्चेत आहे.
रविवारी, गोव्याचे पर्यटनमंत्री रोहन खाउंटे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं रेडिओवरील लोकप्रिय कार्यक्रम ‘मन की बात’ ऐकत होते. त्याच वेळी, मोदी काजीरंगा नॅशनल पार्कमधील पक्ष्यांच्या जनगणनेबद्दल बोलत होते. अगदी त्या क्षणी, एक लहानसा पक्षी उडत उडत आला आणि थेट मंत्री खाउंटे यांच्या खांद्यावर येऊन विसावला!
नेमका तो क्षण इतका परफेक्ट होता की वाटावं, जणू निसर्गाने स्वतः त्या संवादात सामील होण्याचा निर्णय घेतला!
खाउंटे यांनी हसतमुखाने, शांतपणे त्या पक्ष्याला बसू दिलं. एखादा जुना मित्र भेटावा तसं त्यांचं हास्य आणि त्या पक्ष्याची बिनधास्तता हे दृश्य पाहून अनेकांचे मन विरघळलं.
गोवा पर्यटन विभागाने हा क्षण टिपून सोशल मीडियावर शेअर केला आणि लगेच तो व्हिडीओ व्हायरल झाला. PTI या राष्ट्रीय एजन्सीनेसुद्धा याला कव्हर केलं. नेटिझन्सनी या दृश्याला “प्रकृतीचा आशीर्वाद” तर काहींनी “योगायोग नव्हे, निसर्गाची हजेरी!” असं म्हटलं.
या क्षणी मोदी म्हणत होते, “काजीरंगा केवळ गेंड्यांसाठी नव्हे, तर पक्ष्यांच्या विविध प्रजातींसाठीही ओळखलं जावं. यंदा पहिल्यांदाच Grassland Bird Census घेण्यात आलं. AI तंत्रज्ञानाच्या मदतीने, पक्ष्यांना त्रास न देता त्यांची ओळख पटवण्यात आली.”
आणि दुसरीकडे, गोव्यात एका मंत्र्याच्या खांद्यावर एक पक्षी अगदी नैसर्गिकरित्या विसावलेला होता तंत्रज्ञानाशिवाय, कोणत्याही प्रयत्नाशिवाय केवळ पंख आणि संवेदना घेऊन. हे दृश्य म्हणजे मोदींच्या संदेशाचं जिवंत प्रतीकच वाटावं.
येथे पाहा व्हिडीओ
हा व्हिडीओ पाहून अनेकांनी लिहिलंय, “जेव्हा माणूस आणि निसर्ग यांचं नातं इतकं सुंदर होतं, तेव्हा शब्द कमी पडतात!”