डोंबारी खेळ करणाऱ्या एका अत्यंत गरीब घराच्या मुलीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. आपल्या परिस्थितीवर मात करत आयुष्याच्या या लढाईत तिने महत्वाचा टप्पा पार केला आहे. या गुणवंत विद्यर्थिनींचे नाव काजल जाधव. दहावीच्या परीक्षेत ४७.८०% गुण मिळवत ती उत्तीर्ण झाली आहे.

पिंपरी चिंचवड मधील ‘पुनरुत्थान समरसता गुरुकुलम’ या आश्रम शाळेत तिने शिक्षण घेतलं. काजल जाधव हिचा आतापर्यंतचा प्रवास हृदय हेलावून टाकणारच आहे. आई वडिलांना आपल्या पाल्याने प्राविण्य मिळवलेल्या गोष्टीचा नक्कीच आनंद असतो. मात्र हा आनंद साजरा करण्यासाठी काजलला आई वडील नाहीत. जन्मताच काजल नकोशी होती. तिला फेकून देण्याचा निर्णय तिच्या आईने घेतला आणि नकोशी असलेल्या काजलला पुण्याच्या कॉर्पोरेशन पुलावरून खाली फेकणारच तेवढ्यात एका डोंबाऱ्याचे काम करणाऱ्या महिलेने ते पाहिलं. तिने काजलच्या आईला विनवणी केली आणि या चिमुकलीचे प्राण वाचवले. कमलाबाई जाधव असं कालजला सांभाळणाऱ्या महिलेचं नाव. कमलाबाईने काजलला कोणतीही कमी पडू दिली नाही.

काजल जाधव
काजल जाधव

Maharashtra SSC Result 2017 : लग्ननंतर तब्बल १७ वर्षांनी त्या झाल्या दहावी पास

तिला लहानच मोठं केलं तसेच तिला डोंबारी खेळाच प्रशिक्षण देखील दिलं. शेवटी पोटाचा प्रश्न होता, त्यामुळे तिला या खेळात पूर्ण पारंगत केले. ती चार वर्षाची असताना कॉर्पोरेशन येथे डोंबाऱ्याचे खेळ करणाऱ्या काजलवर गिरीश प्रभुणे यांची नजर गेली. तिच्या आईला लागेल ती मदत करायची या अटीवर गिरीश प्रभुणे यांनी तिला पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे घेऊन आले. पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण दिले. मात्र अजून ही सुट्टीमध्ये किंवा घरी गेल्यानंतर काजल डोंबाऱ्याचे खेळ करून आईचे कुटुंब चालवते. दिला दररोज १०० ते २०० रुपये मिळतात. कदाचित खेळ केलाच नाही तर रात्रीच्या जेवणाची भ्रांत असतेच तेव्हा खऱ्या अर्थाने तारेवरची कसरत करत काजलने हे यश संपादन केलं.

Maharashtra SSC Result 2017 : स्पेशल चहा विकून त्याने मिळविले ‘स्पेशल’ यश