पावसाळ्यात वर्षा पर्यटन आणि गड किल्यांना भेटी देण्यासाठी अनेकजण उत्सुक असतात. पण योग्य खबरदारी घेतली नाही तर अशा ठिकाणी मोठे अपघात होऊ शकतात.पावसाळ्यात पर्यटन करणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचबरोबर पावसाळ्यात पर्यटन स्थळी होणाऱ्या अपघातांची संख्याही वाढत आहे. कुंडमाळा येथील पूल पडून पडून काही पर्यंटक नदी पडल्याची घटना ताजी असताना धोकादायक पर्यटनाचे काही व्हिडिओ समोर येत आहे. अशातच हरिहर गडावरील एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ट्रेकर्सची एकच झुंबड उडाली आहे. व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे.
व्हायरल व्हिडओ हरीहर गडावरील असून तिथे ट्रेकर्सची प्रचंड गर्दी झाल्याचे दिसत आहे. ट्रेकर्सने इतकी गर्दी केली आहे ती तिथे पाय ठेवायला देखील जागा नाही. लोक अक्षरश: जीव मुठीत घेऊन उभे आहेत. कोणी जीव धोक्यात टाकात उंच कड्यावर जाऊन उभे आहे. जराही कोणी इकडे तिकडे झाले तर मोठी दुर्घटना घडू शकते. व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांच्या अंगावर अक्षरश: काटा उभा राहीला आहे. व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे.
shivdurga_mitra_lonavala नावाच्या इंस्टाग्राम खात्यावर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की. अशा गर्दीमुळे मोठा अपघात होऊ शकतो. हे थांबवले पाहिजे. उशीर होण्याआधी पाययोजना केल्या पाहिजेत. गर्दीवर नियंत्रण ठेवले पाहिजे. व्हिडीओ नक्की कधीचा आहे याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही.
हरिहर गडावर ट्रेकर्सची गर्दी, Video Viral
नेटकऱ्यांचा संताप
व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एकाने उपाहासात्मक टिका करत म्हटले की, काही दिवसांनी गडावर जायला जागा नाही मिळाली की लोकं दहीहंडीसाठी करतात तसे मनोरे उभारून एकमेकांच्या डोक्यावर उभे राहून गडावर जातील.”
दुसऱ्याने लिहिले की, किल्ला पडतो वाटतं”
तिसऱ्याने लिहिले की,”अपघात होऊन एक दिवस गडावर प्रवेश बंद होईल.”
चौथ्याने लिहिले की, “ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन एक प्रवेश शुल्क आकारावे. त्या शूल्कामधून तिथे कामासाठी लोक ठेवावीत आणि मुलभूत सुविधा द्यावी जसा की शौचालय आणि स्थानिक फळ विक्रेते किंवा खाद्यपदार्थ विक्रेत्यांना विक्री करण्याची परवानगी द्यावी पण एवढे करणार कोण”
तिसऱ्याने म्हटले की,”गड पहायला किंवा अनुभवायला पावसाच कशाला पाहिजे, उन्हाळ्यात जा, तेव्हा खरे गड प्रेमी भेटतील. पाऊस अनुभवायला बाकी सह्याद्री मध्ये भटका.”
चौथ्याने लिहिले की, “अरे गड आहे तो… मासळी बाजार नाही… त्याचे पावित्र्य राखा रे… उठसुट फक्त फोटोसाठी आणि व्हिडिओसाठी नका जाऊ गडावर. महाराजांच्या विचारांचे आचरण करा.”
पाचव्याने लिहिले की.” permit चालू करा ,online पद्धतीने ठेवा, त्यामुळे येणारे पर्यटक पण नियंत्रणात राहतील”
सहाव्याने लिहिले की, हा शुद्ध मुर्खपणा आहे. मोठी दुर्घटना होण्याची वाट पाहत आहेत का? तिथे मोबाईल कॅमेरा बॅन करा. मग बघू किती जण भेट देतात इथे.
सातव्याने लिहिले की,”हे फक्त हरिहर किल्ल्यावरचं चित्र नाही, तर ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि सह्याद्री पर्वतरांगांतील जवळपास प्रत्येक किल्ल्याची आहे. दर शनिवारी आणि रविवारी गडकिल्ल्यांवर प्रचंड गर्दी उसळते, आणि पावसाळ्यात तर ही गर्दी अक्षरशः धोकादायक पातळीवर पोहोचते.
वाटांमध्ये चिखल होतो, पाय घसरतात, आणि काही ठिकाणी रस्ता पूर्ण बंद होतो. तरीही प्रत्येक ट्रेकिंग ग्रुपचा लीडर आणि ट्रेकर एक मोठा घोळका घेऊनच येतो, अनेक वेळा हे फक्त व्यवसायासाठी – पैसे कमवण्यासाठी केले जाते, लोकांच्या जीवाशी खेळत.
गावातील स्थानिक लोक, ग्रामपंचायत, आणि पोलीस प्रशासन याकडे फारसं लक्ष देत नाहीत. सर्वजण केवळ एखाद्या मोठ्या दुर्घटनेची वाट पाहत आहेत का, असा संशय यायला लागतो. वेळेत जागरूकता आणि कडक नियम लागू न केल्यास, एखादा अपघात घडल्यावरच सर्वांची झोप उडेल, पण तेव्हा खूप उशीर झालेला असेल.”