बऱ्याच लोकांना चहासोबत स्नॅक्स खायची सवय असते. काही जण चहासोबत एखादं बिस्कीट खातात, तर काहींना चहामध्ये रस्क टोस्ट बुडवून खायची सवय असते. यामुळे अवेळी लागलेली छोटी भूक भागते. तुम्हीही चहासोबत रस्क टोस्ट खात असाल तर सावध व्हायची गरज आहे. कारण सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही टोस्ट खाण्याआधी एकदा तरी विचार कराल.
व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, टोस्ट बनवण्यासाठी एका टेबलावर पीठ ठेवून चार कामगार अगदीच विचित्र पद्धतीत त्याला मळून घेताना दिसत आहेत. तसेच एका अस्वच्छ भांड्यात तेल, पीठ घालून कोणतेही हातमोजे न वापरता त्याला हातानी हलवून घेतले जात आहे. तसेच एक कामगार सिगारेट ओढताना आणि एका हाताने मिश्रण एकजीव करताना दिसतो आहे, जे पाहून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. कामगार कारखान्यात तुमच्या आवडीचे रस्क टोस्ट कसे बनवतात हे तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा.




हेही वाचा…धक्कदायक! खेळता-खेळता लिफ्टमध्ये अडकला चिमुकल्याचा हात; Video पाहून येईल अंगावर काटा…
पोस्ट नक्की बघा :
व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, अगदीच विचित्र पद्धतीने एका टेबलावर पीठ मळून घेतलं जात आहे; तसेच टेबलावरच या पिठात तेल ओतून त्याचे छोटे-छोटे गोळे करून घेतले आहेत आणि भट्टीत भाजण्यासाठी एका पॅनमध्ये ठेवण्यात आले आहेत. पॅनमधून बाहेर काढून याचे छोटे छोटे तुकडे करून पुन्हा एकदा भट्टीत भाजण्यासाठी ठेवून दिले आहे आणि मग त्यांना विक्रीसाठी पॅकिंग करून ठेवलं जात आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ रेल्वे अधिकारी अनंत रुपनगुडी यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @अनंत_IARS या अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच त्यांनी या व्हिडीओला; हे जर खरं असेल तर मला पुन्हा टोस्ट खाण्याची भीती वाटेल असे कॅप्शन दिले आहे. अनंत रुपनगुडी हे १९९७ च्या बॅचचे IRAS अधिकारी आहेत. तसेच त्यांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेक जण विविध प्रतिक्रिया मांडताना कमेंटमध्ये दिसले आहेत.