लहान मुलांना सांभाळणे अगदीच जवाबदारीचे काम असते. लहान मुले आजारी पडल्यावर त्यांची काळजी घेणे, त्यांना खेळायला घेऊन जाताना सतत त्यांच्यावर लक्ष ठेवणे अत्यंत महत्त्वाचे असते. आपण थोडंसं जरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं तर ते काय करून बसतील याचा आपण विचारसुद्धा करू शकणार नाही. तर सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. लिफ्टमध्ये चिमुकला सायकलवर बसलेला असतो आणि त्याची आई त्याच्यामागे उभी असते. अचानक चिमुकला लिफ्टच्या कोपऱ्यात हात ठेवतो आणि त्याचा हात लिफ्टमध्ये अडकतो. व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, आई आणि तिचा चिमुकला लिफ्टमधून घरी जात असतात. लिफ्टमध्ये आईचा चिमुकला त्याच्या खेळण्यातील छोट्या सायकलवर बसलेला असतो. सायकलवर एकटाच खेळत बसलेला चिमुकला लिफ्टच्या कोपऱ्यात त्याचा हात ठेवतो. चिमुकल्याला अंदाज नसतो की, त्याने चुकीच्या ठिकाणी त्याचा हात ठेवला आहे. त्यानंतर काही सेकंदांत लिफ्टचा दरवाजा उघडतो आणि चिमुकल्याचा हात लिफ्टमध्ये अडकतो. आई घाबरून त्याचा हात सोडवण्याचा प्रयन्त करायला लागते. आईने कशा प्रकारे चिमुकल्याची या संकटातून सुटका केली एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघा. हेही वाचा…लग्नात रसगुल्ल्यावरून वऱ्हाड्यांमध्ये तुफान राडा; हाणामारीत सहा जण जखमी व्हिडीओ नक्की बघा : https://www.instagram.com/reel/CyMM2eOPbbk/?utm_source=ig_embed&ig_rid=3da72bef-33b7-4b62-a5c1-25bbb71c6c1b चिमुकल्याचा हात लिफ्टमध्ये अडकलेला पाहून आई घाबरते आणि त्याला हात बाहेर काढण्यासाठी मदत करू लागते. आई लिफ्टचा दरवाजा थोडा मागे ढकलण्याचा प्रयत्न करते पण, चिमुकल्याला असे केल्यावर जास्त वेदना होऊ लागतात. त्यानंतर आई मोबाईलवर फोन करून इमर्जन्सी (Emergency) नंबरवर फोन करून मदत मागते आणि आजूबाजूला आवाज देत काही लोकांना मदतीसाठी बोलावते. त्यानंतर काही सुरक्षा कर्मचारी आणि एक अज्ञात व्यक्ती तिथे येते आणि चिमुकल्याचा लिफ्टमध्ये अडकलेला हात सुखरूप बाहेर काढते. त्यानंतर सर्व मिळून चिमुकल्याला दवाखान्यात घेऊन जातात. ही सर्व घटना लिफ्टमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे; जे पाहून तुमच्याही अंगावर नक्कीच काटा आला असेल. तर सोशल मीडियावर हा व्हिडीओ @otiliocanuto या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजर सोशल मीडियाचा कन्टेन्ट क्रिएटर आहे.