गुजरातमध्ये राहणारे ४४ वर्षीय विजय प्रसन्न गावातील प्रत्येकाच्या कुतूहलाचा विषय ठरले आहेत. आपल्या गायी आणि वासरांवरील प्रेमापोटी घरदार सोडून ते वेगळे राहतात. विजय यांना दोन मुलं आहेत पण घरसंसार सोडून ते गेल्या पाच वर्षांपासून गायींसोबत राहत आहेत .

गायीवरील अतिव प्रेमामुळे अनेकांना त्यांच्याबद्दल एक वेगळंच कुतूहल वाटतं. ‘डेली मेल’ने दिलेल्या माहितीनुसार विजय गेल्या पाच वर्षांपासून गायीसोबत एकत्र राहत आहेत. इतकंच नाही तर गाय, तिची वारसं , बैलदेखील अगदी सहजपणे त्यांच्या घरात वावरताना दिसतात. वासरांना आपुलकीने आपल्या बिछान्यात ते झोपायला जागाही देतात. लाकडी खाटेवर ही वासरं झोपली की विजय त्यांच्या आंगावर चादर पांघरायलाही विसरत नाही.

Google Birthday : गुगलचा १९ वा वाढदिवस आणि तुमच्यासाठी खास १९ सरप्राईज

‘माझ्याजवळ असलेल्या गोधनापेक्षा दुसरी प्रिय गोष्ट मला या जगात नाही, मी त्यांच्याशिवाय जगण्याची कल्पनाच करू शकत नाही.’ अशी प्रतिक्रिया त्यांनी डेली मेलशी बोलताना दिली. त्यांच्याकडे कुत्रे, बैल, मोर, साप असे अनेक प्राणी आणि पक्षी आहेत पण या सर्वात ‘राधा’, ‘पुनम’ आणि ‘सरस्वती’ या गायी आपल्याला सर्वाधिक प्रिय असल्याचंही ते मोठ्या अभिमानाने सांगतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय यांना जुगाराचा नाद होता पण नंतर मात्र त्यांनी गायी पाळायला सुरूवात केली. गायीवरंच त्यांचं पराकोटीचं प्रेम पाहून कुटुंबियांनी, गावकऱ्यांनी त्यांना ठार वेडं ठरवलं होतं पण हळूहळू प्रत्येकाला त्यांच्या वागण्याची सवय होत गेली. गेल्यावर्षी त्यांनी आपल्या एका लाडक्या गायीचं लग्न लावून दिलं होतं, गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नात पाच हजार लोक आले होते तर विजय यांनी लग्नासाठी अठरा लाख रुपये खर्च केले होते.

वाचा : तुम्हीसुद्धा प्रेमात आहात? मग ही जय आणि सुनिताची प्रेमकहाणी नक्की वाचा…