जगभरामध्ये करोनाने थैमान घातलं आहे. करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या दिवसोंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबरच करोना बाधितांची संख्येचा आलेखही वाढताना दिसत आहे. एकीकडे करोनाचा प्रादुर्भाव वाढत असतानाच दुसरीकडे लॉकडाउनचे नियम हळहळू शिथिल करत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी अनेक देशांनी महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच अनेकजण हळहळू कामावर रुजू होताना दिसत आहेत. मात्र मास्क, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांची बंधन घालून देण्यात आली आहेत. मास्क तर आता कपडे किंवा चप्पलांप्रमाणेच झाले असून मास्कशिवाय घराबाहेर पडणार नाही अशी भूमिका अनेकांनी घेतल्याचे दिसून येत आहे. अनेकजण तर ऑफिसमध्येही दिवसभर मास्क घालून असतात. मात्र अशामध्येही मास्क न घालणारेही काहीजण आहेत. त्यातही परदेशात खास करुन अमेरिकेमध्ये मास्क घालण्याला विरोध करणारा मोठा वर्ग आहे. मात्र मास्क घालणाऱ्यास नकार देणाऱ्यांना तसेच मास्क घालण्याचा कंटाळा येणाऱ्यांसाठी एका व्यक्तीने भन्नाट उपाय शोधला आहे. हा उपाय आहे मास्क गनचा. तुमचा विश्वास बसणार नाही पण या मास्क गनच्या मदतीने एवघ्या एक ते दोन सेकंदांमध्ये मास्क घालता येतं.
नक्की पाहा >> Video : मास्क लावल्यावर चष्म्यावर बाष्प जमा होतेय?; ट्राय करा ‘या’ तीन सोप्या ट्रीक्स
अॅलेन पॅन या व्यक्तीने ही मास्क गन तयार केली आहे. अॅलेनने ट्विटवरुन या मास्क गनचे प्रात्यक्षिक दाखवणारा व्हिडिओही पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये अॅलने स्वत:वरच या मास्क गनचा प्रयोग करताना दिसत आहे. गनचा खटका खेचल्यानंतर समोर बसलेल्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर मास्क फेकलं जातं आणि विशेष म्हणजे अगदी कानाच्या मागे दोऱ्या लावण्यापर्यंतचं काम या विशेष गनच्या मदतीने अवघ्या एक ते दोन सेकंदांमध्ये समोरच्या व्यक्तीला काही कळण्याच्या आतच होतं. व्हिडिओमध्ये अॅलन वन, टू आणि थ्री च्या काऊंटला गन शूट करतो आणि मास्क थेट त्यांच्या तोंडावर बसते अगदी मास्कच्या दोऱ्या कानात लटकून एकदम फिट आणि परफेक्टपणे हे मास्क बसलेलं व्हिडिओत दिसत आहे.
“अमेरिका सध्या साथीच्या संकटाला तोंड देत असून मी या संकाटाचा समाना करण्यासाठी ही गन बनवली आहे,” अशी कॅप्शन अॅलेनने या व्हिडिओला दिली आहे.
America has a pandemic problem so I solved it by making a gun: pic.twitter.com/WRaiuVU90K
— Allen Pan (@AnyTechnology) August 15, 2020
हा व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. २० सेकंदाच्या या व्हिडिओ ५२ हजारहून अधिक रिट्विट मिळाले आहेत. १५ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज आहेत.
