Gir Forest Lion Attack Video: जंगलात तो मोबाईल घेऊन थेट शिकार करणाऱ्या सिंहापर्यंत गेला… पण, पुढच्याच क्षणी जी काही गर्जना झाली, ती ऐकून अंगावर काटा उभा राहील. हा VIDEO बघितल्यावर तुमचाही श्वास काही क्षण थांबेल… गुजरातमधून समोर आलेला एक थरारक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातून एक अंगावर शहारा आणणारा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण थेट जंगलात फिरणाऱ्या सिंहाच्या जवळ जाऊन त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढताना दिसतोय. या धाडसाने सीमारेषा पार केल्या असून सोशल मीडियावर या तरुणावर संताप व्यक्त होत आहे. ही घटना भावनगर जिल्ह्यातील तलाजा तालुक्यातल्या बांभोर गावाजवळ घडली असून, हे गाव गीर राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात आहे. गीर हे आशियाई सिंहांचे प्रमुख निवासस्थान मानले जाते आणि इथं या हिंस्त्र प्राण्यांची चांगलीच संख्या आहे.
व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसते की, एक तरुण सिंहाच्या फारच जवळ जाऊन मोबाईलमधून त्याचा व्हिडीओ शूट करत होता. सिंह आपली शिकार खात असतानाच त्याच्याकडे मान वळवून बघतो आणि काही क्षणांतच जोरात दहाडतो. घाबरलेला तरुण लगेच मागे पळतो आणि त्याच्या मित्रांचे ओरडणंही ऐकू येतं. या वेळी सिंह काही क्षणासाठी धाव घेतो, पण नंतर पुन्हा आपल्या शिकारकडे वळतो. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
दूर उभे असलेले काही लोक ओरडून सिंहाचं लक्ष हटवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांच्या वेळेवरच्या प्रतिक्रियांमुळे त्या तरुणाचा जीव वाचतो. तो त्या जागेवरून धावत सुटतो आणि सिंह पुन्हा आपल्या शिकारीकडे वळतो.
हा धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ (पूर्वी ट्विटर) वर व्हायरल झाला असून, यावर युजर्सनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलं, “भाऊसाहेब सिंहाला म्हणायला गेले असतील – भाऊ, एक फोटो दे, सोशल मीडियावर टाकायचाय.” दुसऱ्याने म्हटलं, “ही बहादुरी नव्हे, मूर्खपणाची परिसीमा आहे!” तर तिसऱ्याने थेट मागणी केली की, “अशा प्रकाराच्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, हे लोक केवळ रीलसाठी निसर्गाचं नुकसान करत आहेत.”
येथे पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालणं केवळ मूर्खपणाचं नव्हे, तर कायद्याच्या दृष्टिकोनातूनही चुकीचं आहे. अशा हिंस्त्र प्राण्यांच्या स्वाभाविक वावरात हस्तक्षेप करणं, केवळ स्वतःच्याच नव्हे तर इतरांच्याही जीविताला धोका ठरू शकतो. या घटना एक स्पष्ट संदेश देतात – जंगलातील किंवा कोणत्याही वन्य प्राण्यांशी थेट संपर्क टाळा. त्यांच्या हद्दीत ढवळाढवळ करणं म्हणजे स्वतःचं आयुष्य धोक्यात घालणं.