युद्धात आणि प्रेमात सर्वकाही माफ असतं. या म्हणीला गंभीरपणे घेत, एक प्रेमळ प्रियकराने गर्लफ्रेंडसाठी असं काही केलं की वाचून तुमचं डोक चक्रावेल. आपल्या गर्लफ्रेंडसाठी काहीही करण्यास तो तयार झाला. त्याने त्याच्या गर्लफ्रेंडच्या रूपात तिचे कपडे घालून तिच्यासाठी परीक्षा देण्यासाठी गेला. त्याला वाटलं की ती परीक्षा पास होणार नाही म्हणून त्याने असं केलं. हा व्यक्ती सुरुवातीला हा स्टंट करण्यात यशस्वी झाला असला तरी नंतर या २२ वर्षीय तरुणाला पकडण्यात आले आणि पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

हुबेहूब दिसण्याचा प्रयत्न

एमबूप असं या व्यक्तीचं नाव आहे तर त्याच्या गर्लफ्रेंडचं गँग्यू डिओम असं नावं आहे. त्याच्या गर्लफ्रेंडसारखं दिसण्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली. गॅस्टन बर्जर विद्यापीठातील विद्यार्थी खादीम एमबूपने मेक-अप, हेडस्कार्फ, ब्रा आणि अगदी कानातलेसुद्धा परिधान करून एक स्त्री बनण्यासाठी, स्त्री सारखा दिसण्यासाठी खूप कष्ट घेतले, असे लेडबिबलने म्हटले आहे.

नक्की काय झालं?

आपल्या प्रेयसीला मदत करण्यासाठी एमबूपने ही विचित्र योजना केली होती. तिची हायस्कूल पदवीची परीक्षा होती. तो त्याच्या गर्लफ्रेंड गँग्यू डिओमच्या वतीने सलग तीन दिवस परीक्षेला जाण्यास यशस्वी झाला. पण चौथ्या दिवशी परिस्थिती बिघडली जेव्हा एका निरीक्षकाला त्याच्या दिसण्याबाबत काहीतरी लक्षात आले. त्याला अटक केल्यानंतर, एमबूपने पोलिसांना एका लॉजमध्ये नेले जेथे त्याची १९ वर्षांची प्रेयसीकडे त्याची परीक्षेतून परतण्याची वाट पाहत होती, असं iHarare ने अहवाल सांगितलं आहे.

काय शिक्षा होणार?

डॉटिंग प्रेमीने सांगितले की त्याच्या प्रेयसीच्या प्रेमामुळेच त्याने हे करण्यास सहमती दर्शविली. लव्ह बर्ड्सवर फसवणूक आणि बनावट,परीक्षा फसवणुकीचा आरोप होता. स्थानिक पल्स न्यूजच्या मते, जर जोडप्याला दोषी ठरवले गेले, तर त्यांना पाच वर्षांसाठी कोणत्याही राष्ट्रीय परीक्षेत बसण्यास आणि कोणत्याही डिप्लोमापासून वंचित ठेवण्यात येईल. या जोडीला पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासही होऊ शकतो, असेही अहवालात म्हटले आहे.

तुम्हाला काय वाटत या घटनेबद्दल?