Man Fired For Being Bald : नोकरी करत असताना कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी कोणते नियम लागू करतील, याचा काही नेम नाही. बॉसने मानसिक त्रास देऊन कर्मचाऱ्यांची पिळवणूक केल्याच्या घटनाही सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आल्या आहेत. असाच एक धक्कादायक प्रकार इंग्लंडमध्ये उघडकीस आला आहे. इंग्लंडच्या लीड्स येथे असलेल्या टांगो नेटवर्क कंपनीतील एका बॉसने कर्मचाऱ्याच्या डोक्यावर केस नसल्याने त्याला नोकरीवरून काढून टाकले. मार्क जोन्स असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. ६१ वर्षांच्या मार्कला त्याच्या बॉसने नोकरीवरून काढून टाकलं. कारण डोक्यावर केस नसलेल्या ५० वर्षांच्या वयोगटातील कर्मचाऱ्यांनी नोकरी करू नये, असा नियम इंग्लंडच्या एका कंपनीच्या बॉसने लागू केला होता. मार्क जोन्स असं नोकरीवरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. बॉसने कार्यालयीन कामकाजात भेदभाव केल्याने मार्कची नोकरी गेली पण त्याने ७० लाख रुपये जिंकले.

व्यवस्थापक फिलिप्स हेसकेथ यांच्याकडून मार्कला प्रेरणा मिळाली. कारण फिलिप्सलाही टक्कल असल्याने टांगो नेटवर्क कंपनीच्या सेल्स डायरेक्टर पोस्टवरून काढून टाकण्यात आले होते. कारण फिलिप्सच्या बॉसलाही डोक्यावर केसे नसेलेल कर्मचारी कामावर नको होते. मात्र, जोन्सने कर्मचाऱ्यांच्या अधिकारांवर पायमल्ली झाल्याने थेट न्यायालयात धाव घेतली. दोन वर्षे काम केल्यानंतरही बेकायदेशीरपणे नोकरीवरून काढून टाकल्याचा उल्लेख त्याने याचिकेत केला. कंपनीच्या बॉसने कार्यालयीन कामात चांगली कामगिरी न करणाऱ्या कर्माचाऱ्यांच्या यादीत माझ्या नावाचा समावेश केला. भेदभाव करणं हे फक्त कारण होतं, असे आरोप मार्कने त्याच्या बॉसवर केले.

नक्की वाचा – १० वी पास आहात? रेल्वेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, परीक्षा नाही, अर्ज करताना या गोष्टींची काळजी घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्कने दिलेल्या राजीनाम्याच्या पत्रात म्हटलंय, माझ्याबद्दल कंपनीत ज्या प्रकारे तक्रार दाखल करण्यात आली, ते पाहून मी खूप दु:खी झालो. मला चुकीच्या पद्धतीने टार्गेट करण्यात आलंय. माझं मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. कामात चांगली कामगिरी करता येऊ नये, यासाठी हे सर्व करण्यात आलं.” न्यायालयात मार्कच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान न्यायाधीशांनी म्हटलं, “डोक्यावर केस असणे किंवा नसणे हे कर्मचाऱ्याला कामावरून काढण्याच्या तरतुदींमध्ये बसत नाही. टॅंगो कंपनीने जोन्स यांना कामावरून काढून टाकणे अव्यवहार्य आहे. या कंपनीने कर्मचाऱ्यांची विश्वासहार्यता तोडली आहे.”