सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजारामुळे, शॉपिंग मॉल, मूव्ही हॉल, किराणा दुकाने यासारखी अनेक सार्वजनिक ठिकाणे सुरक्षिततेसाठी व्यक्तींचे लसीकरण प्रमाणपत्र पाहण्याची विनंती करत आहेत. मुंबईतील लाइफलाइन असलेल्या अर्थात लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्यासाठीही लसीकरण प्रमाणपत्र अनिवार्य केलं आहे. आजकाल आपण कुठेही बाहेर जायचं म्हटल तरी लसीकरण प्रमाणपत्र सोबत घेऊन जावच लागतं.आता, एका व्यक्तीने प्रत्येक वेळी वैयक्तिकरित्या प्रमाणपत्र घेऊन जाण्याच्या अडचणींना तोंड देण्यासाठी त्याने हे एक मनोरंजक पाऊल उचलले आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये एक माणूस QR कोड टॅटू दाखवत असल्याचे दिसून येते ज्यामुळे स्कॅन केल्यावर लसीकरण प्रमाणपत्र मिळते. व्हिडीओवर नेटीझन्सच्या संमिश्र कमेंट्स येत आहेत.

नेटीझन्सच्या प्रतिकिया

टॅटू आर्टिस्ट गॅब्रिएल पेलेरोनने शेअर केलेला व्हिडीओ, क्यूआर कोड टॅटू नक्की कसा काम करतो हे दर्शवितो. २१ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या क्लिपला ६,६०० पेक्षा जास्त लाइक्स आणि अनेक प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. काहींना ही कल्पना आवडली, तर काहींनी महामारी अस्तित्वात नसल्यावर टॅटू कसा अप्रासंगिक असेल हे व्यक्त केले. अनेकांनी क्लिपच्या खाली मोठ्याने हसणारे इमोजी शेअर केले.“हे युनिक आहे” एका इन्स्टाग्राम वापरकर्त्याने लिहिले. “छान कल्पना आहे पण, काही वर्षात हे मूर्ख दिसेल” दुसर्याने टिप्पणी केली. “हाहाहा. चांगली कल्पना ” तिसऱ्या वापरकर्त्याने टिप्पणी केली.

पेलरोनने नुकतीच पोस्ट केलेली त्याची निर्मिती जवळून बघा

कोड काम करतो की नाही यासाठी त्याने एक प्रयोगही करून पहिला. व्हिडीओमध्ये मेकडॉनल्समध्ये तो जातो. बाहेरच तो टॅटू दाखवत कोड स्कॅन करतो. आणि काही क्षणात त्याचं लसीकरण प्रमाणपत्रही फोनवर दिसलं. तो पुढे मेकडॉनल्समध्ये हवं ते ऑर्डरकरून खातानाही दिसत आहे.

या टॅटूबद्दल तुमचे काय मत आहे?