Boy crazy dance viral video: लग्न सराईचा सीजन सुरु झाल्याने भन्नाट डान्सचे एकापेक्षा एक जबरदस्त व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत. गतवर्षी नागीन डान्स, मुर्गा डान्सचे ठुमके आपण व्हायरल झालेल्या व्हिडीओंच्या माध्यमातून पाहिले असतील. पण आता एका नव्या डान्सच्या व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातलाय आणि त्या डान्सचं नाव आहे ‘गुटखा डान्स’. एका पठ्ठ्यानं भर लग्नमंडपात गुटखा डान्सच्या भन्नाट स्टेप्स करून लोकांचं भन्नाट मनोरंजन केलं आहे. हा मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत असल्याने नेटकऱ्यांनी हसू आवरत नाहीय. हळदी समारंभ सुरु असताना डीजेच्या तालावर एका तरुणाने गुटखा डान्सचे भन्नाट ठुमके लगावून अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
तरुणाच्या या ‘गुटखा डान्स’पुढं लुंगी डान्सही होईल फेल
हा व्हिडीओ butterfly_mahi नावाच्या युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओला पाहून लोकांचं जबरदस्त मनोरंजन झालं आहे. कारण नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रियांचा वर्षाव या व्हिडीओवर केला आहे. व्हिडीओला आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. कारण तरुणाच्या गुटखा डान्सच्या भन्नाट स्टेप्स पाहून नेटकरीही लोटपोट हसल्याशिवया राहिले नसतील. लग्न सोहळ्यात आलेल्या वऱ्हाडी मंडळीचं मनोरंजन करण्यासाठी काही तरुण वेड्यासारखे डान्स करु लागतात. अशातच लग्नात पार्टी असल्यावर तर अशा तरुणांना भन्नाट डान्स करण्याची झिंगच चढलेली असते. वऱ्हाडी मंडळीच काय नवरा-नवरीही मंडपात थिरकल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इथे पाहा व्हिडीओ
पण एका तरुणाने डीजेच्या तालावर केलेला गुटखा डान्स अनेकांना पोट धरुन हसवल्याशिवाय राहणार नाही. कारण या तरुणाने जबरदस्त ठुमके लगावत साऱ्या वऱ्हाडी मंडळींच लक्ष वेधून घेतल्याचं या व्हिडीओत दिसत आहे. भर लग्नमंडपात दारुच्या नशेत टुल्ल होऊन एका पठ्ठ्याने गागीन डान्सला टक्कर देणारा मुर्गा डान्स केला होता. हा व्हिडीओही इंटरनेटवर प्रचंड व्हायरल झाला होता. डीजे सुरु होताच त्या तरुणाला कोंबड्याच्या गाण्याची झिंग चढली होती अन् थेट एका मुलीसमोर तो ठुमके मारू लागल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओला पाहिल्यानंतरही नेटकऱ्यांना भन्नाट प्रतिक्रिया दिल्या होत्या.