Viral Video : तरुण पिढीची पहिली पसंती म्हणजे बाईक. विविध कंपनीच्या हटके वैशिष्ट्ये असणाऱ्या अनेक दुचाकी तरुण पिढीला आकर्षित करतात. आतापर्यंत तुम्ही विविध कंपनीच्या दुचाकी पहिल्या असतील. पण, आज एका व्हायरल व्हिडीओत एक खास मोटरसायकल पाहायला मिळाली आहे. सुरतच्या रस्त्यावर एक व्यक्ती अनोखी मोटरसायकल चालवताना दिसली आहे; जी पाहून तुम्हालाही नवल वाटेल.

व्हायरल व्हिडीओ सुरतचा आहे. सुरतच्या रस्त्यावर अनेक गाड्या ये-जा करताना दिसत आहेत. पण, यातच एक खास गाडी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. कारण- एक अज्ञात व्यक्ती खास मोटरसायकल चालवताना दिसते आहे. या मोटरसायकलभोवती दोन मोठ्या स्टीलच्या रिंग बसवण्यात आल्या आहेत आणि या स्टीलच्या रिंगमध्ये ही दुचाकी बसवण्यात आली आहे. त्या गाडीवर चालक बसला आहे; जी दिसायला खूपच खास आहे. अज्ञात व्यक्तीची अनोखी मोटरसायकल एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…

हेही वाचा…रोपे लावण्यासाठी शेतकऱ्यांचा अनोखा जुगाड; एका व्यक्तीच्या पायाला दोरी बांधून फरपटत नेल्याचा VIDEO पाहून डोकंच धराल

व्हिडीओ नक्की बघा :

अनोखी मोटरसायकल :

अज्ञात व्यक्तीने या मोटरसायकलची स्वतः खास अशी रचना केली आहे. मोटरसायकल साधीसुधी नसून त्याला वर्तुळाकार दोन मोठ्या स्टीलच्या रिंग बसवण्यात आल्या आहेत. या स्टीलच्या रिंग मोटरसायकल चालवणाऱ्या चालकास पूर्णपणे झाकून टाकतात. तसेच या दोन वर्तुळाकार रिंगच्या आतमध्ये ही अनोखी मोटरसायकल बसवली आहे आणि मधोमध चालक बसून दुचाकी चालवत आहे. तसेच रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या एक चालकानं हे पाहताच या अनोख्या मोटरसायकल चालवणाऱ्या चालकाचा व्हिडीओ शूट केला आहे आणि सोशल मीडियावर तो शेअर केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @iamsuratcity या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून “२०५० ची अ‍ॅक्टिव्हा”, “काका भविष्यातले टाइम ट्रॅव्हलर आहेत”, ‘स्पीडब्रेकरवरून जाताना तुम्हाला इजा होऊ शकते’, ‘मेन इन ब्लॅक चित्रपटात अशी मोटरसायकल होती; आज प्रत्यक्षातही बघितली ‘ ; असे अनेक युजर कमेंट करताना दिसून आले आहेत.