Man on returning to India after 4 years abroad says it was Best decision of my life Viral Post : भारत आणि परदेशात काम करण्याचे अनुभव लोक वारंवार सोशल मीडियावर शेअर करतात. नुकतेच अशीच एक पोस्ट रोडिटवर करण्यात आली आहे. परदेशात चार वर्ष राहिलेल्या एका रेडिट यूजरने केलेली ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. या व्यक्तीने दोन वर्ष अमेरिकेतील टेक्सासमध्ये आणि दोन अॅमस्टरडॅम, पॅरिस आणि म्युनिकमध्ये घालवली आणि त्यानंतर त्याचे म्हणणे आहे की भारतात परत येणे हा त्याच्या आयुष्यातील ‘सर्वोत्तम निर्णय’ आहे. या पोस्टमुळे ऑनलाइन चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये त्याने चांगल्या पगारावर रिमोट काम करताना दक्षिण भारतातील एका टियर-३ शहरात स्थायिक होण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही मांडले आहेत.
नेमकं कारण काय?
या वापरकर्त्याने भारतात परतल्याचा सर्वात मोठा फायदा हा वांशिक भेदभावापासून सुटका हा असल्याचे नमूद केले आहे. “माझी मुले अशा शाळेत जातील जेथे त्यांना कोणीही जित्स(Jeets) ‘, ‘ब्राउन करी’, ‘पूप ब्लॉकर’ किंवा इतर कोणत्याही नवीन शिव्या देणार नाही, याचा विचार करून मला खरोखर खूप चांगले वाटत आहे. ही मनःशांती अमूल्य आहे. मला कोणत्याही देशात थेटपणे वर्णद्वेष सहन करावा लागला नाही, पण अमेरिकेत अप्रत्यक्ष मार्गांनी जाणवला. जसे की वेटर आमच्याकडे दुर्लक्ष करायचे. आमच्याशी बोलताना ‘कृपया’ शब्दाचा वापर करायचे नाही इत्यादी.
भारतात राङण्याचा आणखी एक फायदा म्हणजे सहज उपलब्ध होणारी आरोग्य सेवा असल्याचे या वापरकर्त्याने सांगितले. अमेरिका किंवा युरोप प्रमाणे येथे उपचारांसाठी वाट पाहावी लागत नाही. त्याउलट भारतात तातडीने वैद्यकीय मदत मिळते. “भारतात तुम्ही ब्रेन सर्जन किंवा सुपर-स्पेशालिटी डॉक्टरांची अपॉईंटमेंट त्याच दिवशी घेऊ शकता आणि ती अश्चर्यकारकरित्या परवडणारी असते,” असे या व्यक्तीने लिहिले. इतकेच नाही तर त्याने त्याच्या काकांचे वेल्लामल रुग्णालयातील लिव्हर ट्रान्सप्लांटचे मोफत झाल्याचे उदाहरण देखील दिले.
दररोज आईला भेटू शकतो…
या रेडिटरने भारतात पैसे कमावने देखील सोपे असल्याचे सांगितले. तो म्हणाला की कमर्शियल प्रॉपर्टीमध्ये केलेल्या गुंतवणुकीतून तो महिन्याला १ लाख रुपये कमवतो आणि त्याचा खर्च २० हजार रुपये दर महिना इतका कमी ठेवतो. इतकेच नाही तर, पूर्वी हॉटेलात काम करणारा कूक आणि इतर घरगुती काम करणारे त्याच्या जीवनशैलीचा दर्जा देखील वाढवतात, असेही त्याने सांगितले. तसेच या सर्व गोष्टींबरोबर भावनिक कारणे देखील तेवढीच महत्त्वाची असल्याचे त्याने नमूद केले आहे. “जर माझ्या आईला मला आयुष्यात अजून फक्त १० ते १५ वेळाच भेटायला मिळाले तर? हे माझ्या मनाला खूप लागले. आता मी तिला दररोज पाहतो आणि या सुखाची तुलना कशाचीही होऊ शकत नाही..”
भारतात अजूनही भ्रष्टाचार
असे असले तरी त्याने मान्य केले की भारतातील सार्वजनिक वाहतुकीत युरोपाप्रमाणे स्वच्छता आणि कार्यक्षमता कमी आहे आणि भ्रष्टाचार अजूनही आहे, तरी या त्रुटींचा त्याच्या दैनंदिन जीवनावर फारसा परिणाम होत नाही यावर त्याने भर दिला. त्याच्यासाठी जिवंतपणा, खिशाला परवडणे आणि कुटुंबाशी जवळीकता या गोष्टींमुळे भारत खऱ्या अर्थाने योग्य ठिकाण ठरते.