वाढदिवस प्रत्येकासाठी खास असतो. प्रत्येक व्यकीत हा दिवस आपल्या जवळच्या व्यक्तींबरोबर अत्यंत खास पद्धतीने साजरा करतो. जगभरात वाढदिवस साजरा करण्याच्या विविध पद्धती आहे. भारतीय संस्कृतीनुसार, वाढदिवशी औक्षण करतात, मोठ्यांचे आशिर्वाद करतात आणि आवडीचा गोड पदार्थ करतात. तर पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये वाढदिवशी केक कापला जातो, मनातील इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करत केकवरील मेणबत्या फुंकतात. पाश्चिमात्यच नव्हे आता भारतीयांमध्येही वाढदिवशी केक कापण्याची पद्धत पाहायला मिळते. लहान मोठे प्रत्येकाच्या वाढदिवशी केक कापतात. वाढदिवसाचा केक कापण्याची एक सामान्य गोष्ट झाली असताना एका व्यक्तीने हटके पद्धतीने वाढदिवस साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हायरल व्हिडिओमध्ये अजय नावाचा माणूस केकऐवजी चक्क मोठी पपई कापताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की या व्यक्तीने वाढदिवसाला केक ऐवजी पपई का कापली असावी.

डॉ कविता रेनिकुंतला यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला आहे. वाढदिवस साजरा करण्यासाठी बॅनर लावले आहे. फुगे लावून सजावट केली आहे. एक मोठी पपई टेबलाच्या मधोमध ठेवली आहे. त्या व्यक्तीच्या आजुबाजूला नातेवाईक मित्रमंडळी जमले आहे. त्यानंतर हा माणूस जसे केक कापतात तसे ही पपई कापतो. सर्वजण त्याला “हॅपी बर्थडे” म्हणत शुभेच्छा देतात. रील शेअर करताना कॅप्शनमध्ये पपईला “ऑरगॅनिक फ्रूट केक” असे संबोधले जाते.

हेही वाचा – मित्राला झोका देता देता घसरून पडला व्यक्ती, थेट दरीत…. थरारक घटनेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

व्हिडिओ पहा:

हटके स्टाईलने वाढदिवस साजरा करणाऱ्या व्हिडीओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओ ४ मिलियन पेक्षा जास्तवेळा पाहिला जात आहे. व्हिडीओ पाहून लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी या साखरयुक्त केकच्या आरोग्यदायी पर्यायाचे कौतुक केले, तर काहींनी व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या.

हेही वाचा – Video : पळी वापरून काढा गुढीची सुंदर रांगोळी, पाहताक्षणी लोक म्हणतील, “वाह! सुरेख”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भिन्न मते असूनही, अजयने एका विशाल पपईबरोबर वाढदिवस साजरे करण्याची निवड केली आहे हे दर्शविते की कोणीही आपला वाढदिवस हटके पद्धतीने कसा साजरा करू शकतो. केक कापणे असो, आवडते पदार्थ खाणे असो किंवा नवीन काहीतरी करून पाहणे असो, वाढदिवस हा शेवटी आनंदाचे क्षण घेऊन येतो.