झोका खेळायला कोणाला आवडत नाही. आपल्यापैकी जवळपास प्रत्येकाने लहानपणी झोका खेळण्याचा आनंद घेतला असेल. गावी झाडच्या फांदीला झोका बांधून मनसोक्त झोका खेळण्याचा आनंद अनेकांनी घेतला असेल. शहरात बागेमध्ये आजही लहानमुले झोका खेळताना दिसतात. झोका खेळण्याची आता नवा ट्रेंड आला आहे. आजकाल अनेक पर्यटन स्थळी उंच डोंगरावर, खोल दरीच्या टोकाला झोक्यावर बसण्याचा आनंद अनेकजण घेतात. अशा झोक्यावर बसणे साहसी खेळ म्हणून पाहिले जाते त्याचबरोबर निसर्गरम्य ठिकाणी अशा झोक्यावर बसून फोटो शूट करण्याचा नवा ट्रेंड आला आहे. गोवा, बालीसह अनेक पर्यटन स्थळी असे झोके पाहायला मिळतात. सोशल मिडियावर अशा झोक्यावर बसलेल्या पर्यटकांचे फोटो व्हायरल होत असतात. दरम्यान अशाच एका झोक्यचा आनंद घेणाऱ्या मित्रांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हिडीओ पाहून तुमच्या काळजात धस्स होऊ शकते कारण व्हिडीओमध्ये झोका खेळताना मित्रांसह एक अपघात होतो पण थोडक्यात दोघांचा जीव वाचतो.

झोका खेळताना कधी उंच झोका घेण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन झोक्यावरील व्यक्ती खाली पडते. पण जेव्हा हा झोका उंच डोंगरावर, खोल दरीच्या टोकाशी असेल तेव्हा मात्र हा उंच झोका घेण्याचा प्रयत्न जीवावर बेतू शकते. असेच काहीसे व्हायरल व्हिडीओमध्ये घडले आहे.

हेही वाचा – गुढीपाडव्याला खास ‘आम्रखंड-पुरीचा बेत! मग घरीच सोप्या पद्धतीने बनवा ‘आम्रखंड’; ही घ्या रेसिपी

झोका देता देता घसरला व्यक्ती अन् थेट दरीत

हा व्हिडिओ crane.rasool नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एका उंच टेकडीवर एक झोका बसवलेला दिसक आहे, ज्यावर एक व्यक्ती आनंदाने बसलेली दिसत आहे. समोर खूप खोल दरी आहे, पण त्या व्यक्तीला त्याची भीती वाटत नाही, तो फक्त झुल्याचा आनंद घेत असल्याचे दिसते. व्हिडीओमध्ये एक व्यक्ती झोका देताना दिसत आहे. झोका देण्याचा उत्साहाच्या नादात तो स्वत:चा आणि मित्राचा जीव धोक्यात टाकतो. झोक्यामागे उभा व्यक्ती जोरात झोका देतो. तो झोका देत मागून पुढे येतो पण तेवढ्यात त्याचा पाय एका दोरीत अडकतो आणि तो जमिनीवर पडतो झोक्यासह ओढला जातो.. झोक्याला जोरात ढकल्यामुळे तो उंच जातो त्यासह झोका देणारी व्यक्ती काही क्षण हवेत लटकते. पण झोका पुन्हा मागे येतो त्यासह झोक्याला लटकेले व्यक्ती पुन्हा जमिनीवर आदळते. त्याचा पाय झोक्याला अडकलेल्या दोरीतूनही निसटतो. या सर्व प्रकारामुळे झोक्यावर बसलेल्या व्यक्तीलाही हिसका बसतो आणि झोका वाकडा होता. सुदैवाने त्याला आणि त्याच्या मित्राला काहीही हानी पोहचत नाही. व्हिडीओ पाहून काळजात धस्स होते. व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा – Video : पळी वापरून काढा गुढीची सुंदर रांगोळी, पाहताक्षणी लोक म्हणतील, “वाह! सुरेख”

अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडिओ २० दशलक्षाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे आणि २६ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. व्हिडिओवर कमेंट करत लोक याला खूप धोकादायक म्हणत आहेत. त्यामुळे काही लोकांनी त्याला साहसी म्हटले. त्याच वेळी, काही लोकांनी असा खेळ करू नका ज्यामुळे जगणे कठीण होते.