Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हसवणारे असतात काही रडवणारे असतात तर काही व्हिडीओ हे थक्क करणारे असतात. ‘जैसे ज्याचे कर्म, तैसे फळ देतो रे ईश्वर’; आपण जे वागतो, बालतो तेच आपल्यासोबत घडतं हे आपण सगळ्यांनीच आतापर्यंत ऐकलं आहे. तुम्ही एखाद्याला त्रास दिला तर तुम्हालाही कुणीतरी त्रास देईल किंवा तुम्ही एखाद्यासोबत चुकीचं केलं तर उद्या किंवा एक दिवस तुमच्यासोबतही ते घडू शकतं. जसे करावे तसे भरावे अशी म्हण तुम्ही अनेकदा ऐकली असेल. अनेक जण दुसऱ्याचं वाईट चिंतायला किंवा करायला जातात आणि त्यांच्यासोबतच वाईट घटना घडते.

अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास एखाद्याचे आपण वाईट करण्याचा विचार करतो आणि आपल्या बाबतीतही वाईटच घडते. याच ताजं उदाहरण देणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. समुद्रात ऑक्टोपसला त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला कशी अद्दल घडते ते पाहा. एका व्यक्तीच्या कर्माची शिक्षा त्याला लगेच मिळाल्याने तो आता पुन्हा अशी चुक करण्यापूर्वी नक्कीच १०० वेळा विचार करेल.

एका तरुणाला ऑक्टोपसला त्रास देणं चांगलंच महागात पडलं आहे. या व्हिडीओममध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण ऑक्टोपसला टोचून पकडताना दिसत आहे, परंतु यावळी ऑक्टोपसनं तरुणाला जोरदार प्रत्युत्तर दिलंय.ऑक्टोपसनं तरुणाचा हात, तोंड आणि गळा संपूर्णपणे पकडून ठेवला. यावेळी अक्षरश: तरुणाला श्वासही घेता येत नाहीये. तो अक्षरश: पाण्याच्या वर जातो, अखेर बऱ्याच प्रयत्नानंतर तो सुटतो मात्र अनेकांनी याला वन्यजीवांचा आदर करण्याचा एक योग्य धडा म्हटले आहे.

पाहा व्हिडीओ

व्हायरल झालेल्या क्षणाने पुन्हा एकदा ऑक्टोपसची बुद्धिमत्ता आणि शक्ती अधोरेखित केली आहे. तसेच लोकांना दूरवरून वन्यजीवांना पाहण्याची आठवण करून दिली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. एका वापरकर्त्याने लिहिले, “निसर्गातील सर्वात हुशार प्राण्यांपैकी एकाशी त्यानं पंगा घेतला हे त्याला कदाचीत माहिती नाहीये? दुसऱ्याने लिहिले, “त्या ऑक्टोपसने त्याचा जबडा घट्ट दाबला—कल्पना करा की तो मोठा, भयानक असता तर!” तर अनेकांनी ऑक्टोपसच्या ताकदीचे कौतुक केले.