तुम्ही अनेकदा ‘सबवे सर्फर’ हा गेम खेळला असाल, ज्यात मुलगा चालत्या ट्रेन्सवर उड्या मारत कॉइंट्स जमा करण्यासाठी पळत सुटतो. यावेळी वाटेत त्याला अनेक गिफ्ट्स मिळतात. पण हे कॉइंट्स आणि गिफ्ट्स मिळण्यासाठी त्या मुलाला आपल्याला स्क्रीनवर बोटाने लेफ्ट, राईट करत राहावे लागते. अशाप्रकारे हा गेम लहान मुलं आवडीने खेळताना दिसतात. पण, तुम्ही प्रत्यक्षात कधी ‘सबवे सर्फर गेम’प्रमाणे ट्रेनवर धावणारी व्यक्ती पाहिली आहे का? नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती ‘सबवे सर्फर गेम’प्रमाणे चक्क चालत्या ट्रेनच्या छतावर धावताना दिसत आहे. गेममध्ये काही गोष्टी पाहताना ठीक वाटतात, पण या व्यक्तीने प्रत्यक्षात केलेली ही कृती पाहून काही जण आश्चर्यचकित झाले आहेत, तर काहींनी संताप व्यक्त केला आहे.

या धक्कादायक व्हिडीओमध्ये एक व्यक्ती न घाबरता बिनधास्तपणे चालत्या ट्रेनच्या छतावर आनंदाने धावत असल्याचे दिसून येते आहे. या व्यक्तीने पांढरा शर्ट आणि हिरवी लुंगी घातली असून डोक्यावर लाल स्कार्फ बांधला आहे.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका पुलाखालून ट्रेन जात असल्याचे दिसत आहे. यावेळी एक व्यक्ती हातात काहीतरी धरून हिरोपंती करत चालत्या ट्रेनच्या छतावरून धावत सुटते. व्यक्तीचे असे वागणे निश्चितच धोकादायक आहे, त्यामुळे युजर्स या कृतीवर संताप व्यक्त करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चालत्या ट्रेनच्या छतावर चढला अन् थेट धावत सुटला

चालत्या ट्रेनच्या छतावर धावणाऱ्या या व्यक्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी, अरे हा तर सबवे सफरमधील खरा हिरो असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ @tweetsbyaravind नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये ‘Moye-Moye’ असे लिहिले आहे. या मजेशीर व्हिडीओवर युजर्स विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले, ‘ट्रेनमिल.’ दुसर्‍या युजरने लिहिले, ‘पर्सनल ट्रेडमिल.’ तर अनेकांना व्यक्तीची ही कृती पाहून ‘सबवे सर्फर गेम’ची आठवण झाली.